पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जलप्रलय. [प्रक०५ प्रक जलप्रलय. (उत्प०६-९.) । १. आणि माणसें भूमीच्या पाठीवर बहुत होऊ लागली. तेव्हां देवा- चे पुत्र (शेथाचे वंशज) यांनी माणसांच्या कन्यांस पाहिले की त्या सुंदर आहेत, आणि सर्वांतून ज्या त्यांनी निवडल्या, त्या त्यांनी आपल्यासाठी बायका करून घेतल्या, आणि तेणेकडून शेथाच्या वंशांतील घराण्यांत दुराचरण होऊ लागले आणि दुष्टाई सर्व मनुष्यांमध्ये प्रबळ झाली. तेव्हां परमेश्वर बोललाः "माझा आत्मा माणसासी वाद सर्वकाळ करणार नाही, कारण की तो मांस आहे; तथापि त्याचे दिवस १२० वर्षे होतील." आणि परमेश्वराने पाहिले की माणसाची दुष्टाई पृथ्वीवर मोठी, आणि त्याच्या हृदयाच्या विचारांतील प्रत्येक भावना सर्व दिवसांत केवळ वाईट आहे. तेव्हां परमेश्वराने माणसाला पृथ्वीवर उत्पन्न केले होते यामुळे तो अनुतापला. नोह तर परमेश्वराच्या दृष्टांत कृपा पावला, कारण की तो नीतिमान व प्रामाणिक माणूस असून नीतीचा घोषक होता (२ पेतर २. ५), आणि तो आपल्या पिढीच्यामध्ये देवाच्या संगतीं 'चालला. यास्तव देवाने नोहाला सांगितले की: “पाहा, पृथ्वीवर सर्व प्राण्यांनी आपली चाल नासविली आहे, तर पाहा, पृथ्वीसुद्धां मी त्यांचा नाश करीन. तूं तर आपणा- साठी तारूं कर, आणि त्या तारवांत कोठड्या कर. ते तारूं या प्रमाणे कर की त्याची लांबी ३०० हात, त्याची रुंदी ५० हात व त्याची उंची ३० हात. आणि त्याला खालचा व दुसरा व तिसरा मजला कर, कारण पाहा, पृथ्वीवर मी जलाचा प्रलय आणतो, परंतु तुजसीं मी आपला करार स्थापीन. आणि तूं तुझ्या घरांतल्या लोकांबरोबर तारवांत जासील, तेव्हां भूमीवरील सर्व जिवांच्या सर्व जातींतून दोन दोन आणि सर्व शुद्ध पशु (यज्ञास उपयोगी) यांतून सात सात सर्वांतून नर व त्याची मादी असीं आ- पल्या संगतीं जगवायासाठी तारवांत घे. आणि जे कांहीं अन्न खातात त्यांतील तूं आपणासाठी मिळवून आपणाकडे सांठवून ठेव, मग ते तुझ्या व त्यांच्या खाण्यासाठी होईल.” तसे नोहाने केले ; देवाने त्याला जे काही आज्ञा- पिले त्याप्रमाणे त्याने केले (इत्री ११,७). सूचना. प्रथम नोहाने लोकांसी बोलून उपदेश केला आणि आपल्या सदाचरणाने लोकांस कित्ताही घालून दिला. नंतर त्याने ते तारू-