पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक०४] स काइनाची व शेथाची संतती. १३ नांव सिल्ला. आदा याबालाला प्रसवली; तो डे-यांत राहणाऱ्यांचा व पश्वादिपाळकांचा बाप झाला. आणि त्याच्या भावाचे नांव युबाल, तो तंतवाद्य व वायुवाद्य वाजविणाऱ्या सर्वांचा बाप झाला. आणि सिल्ला तूबलकैनाला प्रसवली; तो तांबे व लोखंड यांच्या सर्व कारागीरांचा शिक- विणारा झाला आणि त्याची बहीण नामा होती.- आणि लेमेखाने आपल्या बायका आदा व सिला यांस सांगितले की: "लेभेखाच्या बाय- कानो, माझा शब्द ऐका आणि माझ्या गोष्टीकडे कान लावा; कां तर म्या आपल्या घायासाठी माणसाला आणि आपल्या ठेचण्यासाठी तरुणाला जिवे मारिलें, काइनाचा सूड सातपट घेतल्यास, लेमेखाचा सत्याहत्तर पट घेतील"*).

  • ) काहनाची संतती आपल्या पूर्वजाच्या मार्गाने चालन देवाचा मार्ग सोडून देऊन

आडमार्गाने गेली आहे. देवाच्या नियमाविरुद्ध अनेक वायका कराव्या, बलात्कार करावा, सूड उगवावा, नगरें नगरासी, राड्ये राज्यास जोडन ध्यावे, आणि ख्याली खुशाली करावी ह्या अवध्यान ती निमग्न असतां विषयसुखी होती. ४. आणि आदामाच्या आयुष्याची १३० वर्षे झाल्यावर हव्वा पुन्हां पुत्राला प्रसवली, आणि तिने त्याचे नांव शेथ (बदला) ठेवले. कारण तिने मटले की: "हनेलेच्या ठिकाणी देवाने मला दुसरे संतान दिले आहे. मग आदाम ९३० वर्षांचा होऊन तो मेला. शेथाचा पुत्र अनोश नांवाचा होता. त्याच्या दिवसांत लोक परमेश्वराचे नाम घेऊ लागले. आदामापासून सातवा जो हनोख त्याने दुष्ट जगाला देवाच्या क्रोधाविषयी उपदेश करून मटले की: “पाहा, प्रभु आपल्या अयुत पवि- त्रांसहित सर्व दुष्टांस दोषी ठरवायास येतो" (यहू० १४ ). आणि हनोख देवाच्या संगतीं चालला, मग तो नाही असा झाला, कांकी देवाने त्याला नेले. हनोखाचा पुत्र जो मथुशलाह तो ९६९ वर्षांचा झाला. त्याचा पुत्र लमेख याने आपल्या पुत्राचे नांव नोह ठेवून झटले की: “जी भूमि परमे- श्वराने शापली, तिजविषयी आमचे काम व आमच्या हातांचे श्रम यांपासून हा आमास विसावा देईल." आदामापासून नोह दाहावा पुरुष होता*). _*) काइनाच्या संततीहून शेथाची संतती अगदी निराळी होती; ती पृथ्वीच्या निडाप्रमाणे होती, कारण कौं त्यांनी देवाची भोड राखन त्याची भक्ति केली आणि त्याच्या वचनावर भाव ठेवुन त मान्य केले. नोहाच्या जन्मसमयीं जी आशा लमेखाने दाखविली, ती त्याचा विश्वास व भक्ति यांविषयी प्रमाणरूप आहे.