पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ आकाशाच्या राज्याविषयी सात दाखले. प्रक० १२५ करण दर्शविणारी ही वाट अहि. पाखरें ही जगोक इच्छा व वासना व मनाची चंचलता यांची उपमा आहे. प्रभु खोस्त तर नी पाखरं सैतानाकडली आहेत असे सांगुन दर्शवितो की, जण सैतान त्यांचा सोडणारा आहे आणि त्याच्या सेवेत ती असतात. २. आकाशाचे राज्य एका माणसासारखे आहे, त्याने आपल्या शेतांत चांगले वीं पेरले, पण माणसे झोपेत असतांना त्याचा वैरी आला आणि गव्हांमध्ये निदण पेरून गेला. मग पाला फुटला व त्याला फळ आले तेव्हां निदणही दिसू लागले. तर घरधन्याचे चाकर येऊन त्याला ह्मणालेः “महाराज, आपण आपल्या शेतांत चांगले बी पेरले ना? तर त्यांत निदण कोठून आले?" तो त्यांस ह्मणालाः “हे काम कोणा वैयचे आहे. चाकर त्याला ह्मणाले: “आह्मी जाऊन ते जमा करावे असी आपली आज्ञा आहे काय?" तो ह्मणालाः “नका, तुह्मी निदण जमा करतांना त्या संगतीं कदाचित् गहूंही उपटाल; कापणीपर्यंत दोन्हीं बरोबर वाढू द्या, मग कापणीच्या वेळेस मी कापणा-यांस सांगेन का पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्यांच्या पेट्या बांधा, मग गहूं माझ्या कोठारांत सांठवा.” मग त्याचे शिष्य त्याजकडे येऊन ह्मणालेः "शेतांतल्या निदाणाचा दाखला आमास फोडून सांग." त्याने त्यांस उत्तर दिले की: "चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत तर जग आहे; चांगले बी हे राज्यांतील पुत्र आहेत, आणि निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; पेरणारा वैरी तर सैतान आहे; कापणी ही काळाची समाप्ति आहे आणि कापणारे हे दूत आहेत. तर जसें निदण जमा करून अग्नीत जाळतात, तसे या काळाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांस पाठवील, आणि सर्व अडखळविणाऱ्यांस व अधर्म करणा- यांस ते त्याच्या राज्यांतून जमा करून त्यांस अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दांतखाणे होईल. तेव्हां नीतिमान आपल्या बापाच्या राज्यांत सूर्यासारखे प्रकाशतील." ३. आकाशाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो माणसाने घेऊन आपल्या शेतांत पेरला. तो सर्व दाण्यामध्ये बारीक आहे, पण वाढ- ल्यावर भाज्यांमध्ये मोठे होऊन असे झाड होते की, आकाशांतील पक्षी येऊन त्याच्या फांद्यांवर बसतात." ४. आकाशाचे राज्य खमिरासारखे आहे, ते बायकोने घेऊन तीन शेर पिठामध्ये लपवून ठेविले, नंतर ते सर्व (उंडा) फुगले.