पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १२५] आकाशाच्या राज्याविषयी सात दाखले. २६३

  • ) मनष्याने समजन उमजन पवित्र आत्म्याच्या प्रेरणविरुद्ध आपणाला कठीण करून

प्यावे. आणि प्रसिद्ध केलेलें जें तारण त्याचा धिक्कार करावा व त्यास नाकवल व्हावें हेंच पवित्र आत्म्याविरुद्ध पाप आहे. असल्या मनुष्यासाठी अणखी दुसरा उपाय काही नाही. परोशी हे देवाच्या आत्म्याकडून येशू चमत्कार करीत आहे असे जाणत अस- तही तीते सैतानाच्या सामन्याने करितो अस त्यांनी म्हटले, यावरून पवित्र आत्म्या- विरुद्ध अघोर पाप करायास ते प्रवर्तले हे सिद्ध आहे. प्रक० १2. आकाशाच्या राज्याविषयों सात दाखले. (मात्थी १३. मार्क ४. लूका ८.) १. त्यानंतर येशू समुद्राजवळ गेला आणि त्याजवळ मोठा समुदाय मिळाला. ह्मणून तो तारवांत जाऊन बसला आणि सर्व समुदाय तडीवर उभा राहिला. तेव्हां तो दाखले देऊन त्यांस उपदेश करूं लागला, आणि मणालाः "कोणी पेरणारा पेरायास निघाला. तेव्हां कांहीं बी वाटेवर पडले आणि पांखरांनी येऊन ते खाऊन टाकले. आणि फारसी माती नव्हती अशा खडकाळीवर कांहीं पडले, पण सूर्य उगवल्यावर ते कर- पले व त्यास मूळ नसल्यावरून वाळून गेले. आणि कांहीं कांटे-या झाडांमध्ये पडले, मग कांटेऱ्या झाडांनी वाढून ते गुदमारले.--पण चांगल्या भूमीवर कांहीं पडले, आणि कोठे शंभरपट, कोठे साठपट, कोठे तीसपट असे पीक आले. ज्याला ऐकायास कान आहेत तो ऐको!-दाखल्याचा अर्थ तर असा आहे: बीं देवाचे वचन आहे.- राज्याचे वचन कोणीएक ऐकून समजत नाही, तेव्हां तो दुष्ट येतो आणि त्याच्या अंतःकरणांत पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हाच आहे *), खडकाळीवर पेरलेला तो हाच आहे की, वचन ऐकतो, तेव्हांच ते आनंदाने घेतो. पण त्यामध्ये मूळ नाही ह्मणून तो क्षणिक आहे, आणि वचनामुळे क्लेश किंवा छळ झाला ह्मणजे तो लागलाच अडख- ळतो. आणि कांटेन्या झाडांमध्ये पेरलेला, हाच आहे की, वचन ऐकतो परंत या जगाची चिंता व द्रव्याची भूल ही वचने गुदमारतात, ह्मणून याला फळ येत नाही. आणि चांगल्या भूमीवर पेरलेला तो हाच आहे कीं वचन ऐकून समजतो, तो फळ देतोच." . *) ज्या मनुष्याचे अंतःकरण पश्चात्तापरूप नागराच्या फाळाने नांगरलेले नाही आणि विश्वासाकडून देवाचे वचन घेण्यासाठी तयार झाले नाही असल्या मनुष्याचं अतः