पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६२ पवित्र आल्याविरुद्ध दुर्भाषण. प्रक० १२४ ब्बाथ दिवसीं बरें करील की काय हे पाहायास परोशी टपत राहून त्यांनी त्याला विचारले की: "शाब्बाथ दिवसी लोकांस बरे करणे हे योग्य आहे काय ?" याने त्यांस मटले: "शाब्बाथ दिवसी चांगले करणे किंवा वाईट करणे, जिवाला राखणे किंवा मारणे कोणते योग्य बरें?" पण ते उगेच राहिले. अणखी येशू त्यांस ह्मणालाः "ज्याला एक मेंढरूं आहे आणि ते शाब्बाथ दिवसी खांत पडले तर तो त्याला धरून काढणार नाही असा तुह्मांतील कोण माणूस आहे? तर मेंढरापेक्षा माणूस किती मोठा आहे! तसे शाब्बाथ दिवस बरे करणे योग्य आहे." मग त्याने त्यांच्या अंत:करणाच्या कठीण- पणावरून खिन्न होऊन या सर्वाकडे रागाने पाहून त्या म. सास सांगि- तले की: "तूं आपला हात लांब कर." तेव्हां त्याचा हात दुसऱ्या हाता- सारखा बरा झाला. २. तेव्हां कोणी अंधळा व मुका असा भूतग्रस्त याकडे आणला आणि त्याने त्याला बरे केले. मग सर्व लोक थक होऊन ह्मणाले: "हा दावीदाचा पुत्र (मशीहा ) आहेना?" परंतु परोशी बोलले: “भुतांचा अधिकारी बालजबूल याच्या योगाने मात्र हा भुते काढतो." येशू त्यांच्या कल्पना जाणून त्यांस ह्मणालाः “जे जे राज्य आंतल्या आंत विभागले आहे ते ओसाड होते, आणि सैतान सैतानाला जर काढतो, तर तो आपल्या मध्ये विभागला आहे, तर मग त्याचे राज्य कसे टिकेल? पण मी देवाच्या आत्म्याकडून जर भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यांमध्ये आले आहे. बळवान माणसाला पहिल्याने बांधल्याशिवाय त्याच्या घरांत शिरून त्याचे जिन्नस कोणाच्याने कसे लुटवतील? जो मला अनुकूळ नाहीं तो मला प्रतिकूळ आहे, यामुळे मी तुह्मास सांगतो, सर्व पाप व दुर्भाषण यांची माण- सांस क्षमा होईल, पण पवित्र आत्म्याचे विरुद्ध जे दुर्भाषण (पाप) त्याची माणसांस क्षमा होणार नाही. या काळी क्षमा होणार नाहीं, येणा-या काळीही नाहीं * ). फळावरून झाड कळते. अहो सापांच्या पिलानो, तुह्मी वाईट असतां तुह्माला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कांकों अंतःकरणांत जे भरले त्याप्रमाणे तोंड बोलते. मी तुह्मास सांगतो, जो जो व्यर्थ शब्द माणसे बोलतील त्याचा हिशेब ते न्यायदिवसीं देतील. तूं आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरसील आणि आपल्या बोलण्यावरून अन्यायी ठरतील."