पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १२४] हात वाळलेला मनुष्य, २६१ येश ह्मणाला: "तुला बरे होण्याची इच्छा आहे काय ?" रोग्याने उत्तर दिले: "महाराज, पाणी हालविल्यावर मला तळ्यांत टाकायास माझा कोणी माणूस नाही, आणि मी जात आहे इतक्यांत दुसरा कोणी मज- पढें उतरतो." येशूने त्याला मटले: "ऊठ, आपली बाज उचलून जा." त्या दिवसी तर शाब्बाथ होता, यावरून यहूदी या बरे झालेल्याला ह्मणाले: "आज शाब्बाथ आहे, बाज वाहयास तुला योग्य नाही." त्याने त्यांस उत्तर दिले : "ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, आपली बाज उचलन चाल." मग त्यांनी त्याला पुसले की “ ज्याने तुला असे सांगितले तो माणूस कोण आहे ?" पण तो कोण आहे, हे त्याला ठाऊक नव्हते. त्यानंतर येशूने त्याला देवळांत गांठून मटले: “पाहा, तं बरा झालास, यापुढे पाप करूं नको, केले तर तुला यापेक्षा अधिक दु:ख होईल!" त्या माणसाने जाऊन यहूद्यांस सांगितले की : “ज्याने मला कले तो येश आहे." मग त्यामुळे यहूदी येशूच्या पाठीस लागन त्याला जिवे मारायास झटले, कांकी त्याने शाब्बाथ दिवसीं है केले होते. पण येशने त्यांस उत्तर दिले : "आज पावेतो माझा बाप काम करीत आला आहे, आणि मीही काम करीत आलो.” तर यामुळे यहूदी त्याला जिवे मारायास अधिक झटले, कांकी त्याने शाब्बाथ मोडला असे केवळ नाही, तर देव माझा बाप, असे ह्मणून त्याने आपणाला देवासमान केले. यावरून येशूने त्यांस असे उत्तर दिले की: "बाप कोणाचा न्याय ठरवीत नाही, तर सर्व न्याय ठरविणे पुत्राला सोपून दिले आहे, यासाठी की जसा बापाचा मान करतात तसा पुत्राचाही मान सर्वांनी करावा. आणि जसे बापाला आपणांत जीवन आहे, तसे पुत्राला आपणांत जीवन असावे असे त्याने त्याला दिले आहे. शास्त्रलेख शोधून पाहा, कांकी त्यांकडून सर्वकाळचे जीवन तुह्मास आहे असे तुह्मी समजतां आणि मजविषयी साक्ष देणारे तेच आहेत.” प्रक० १२४. हात वाळलेला मनुष्य. पवित्र आत्म्या- विरुद्ध दुर्भाषण. ( मान्थी १२. मार्क ३. लूका ६.) आणि एका शाब्बाथ दिवसी येशूने सभास्थानांत जाऊन उपदेश के- ला, आणि उजवा हात वाळलला असा माणूस तेथे होता. तेव्हां तो त्याला शा-