पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० बेथेस्दा नामक तलावाजवळील रोगी माणूस. प्रक० १२३ मला काही बोलायाचे आहे." तो ह्मणालाः “गुरू, बोल." येशू ह्मणालाः "एका सावकाराचे दोन कर्जदार होते, एकाला शंभर रुपये देणे होते, आणि एकाला दहा, पण फेडायास त्यांजवळ कांहीं नसल्यावरून त्याने कृपा करून दोघांस सोडले. तर त्यांतून कोणता त्याजवर अधिक प्रीति करील, हे सांग." शिमोनाने उत्तर दिले की: "ज्याला आधिक सोडलें तो, असे मला वाटते." येशू याला ह्मणालाः “ठीक ठरविलेंस." आणि त्या बायकोकडे मुरडून त्याने शिमोनाला मटलेः "या बाईला पाहतोस ना ? मी तुझ्या घरी आलो, तेव्हां खा माझ्या पायांसाठी पाणी दिले नाहीं, इने तर आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या डोक्याच्या केसांनी पुसले वा माझें चुंबन घेतले नाही, पण ही मी आंत आल्यापासून माझ्या पायांचे चुंबन घेतां राहिली नाहीं; वा माझ्या डोक्याला तेल लावले नाही, पण इने माझ्या पायांस सुगंध तेल लावले आहे. या कार- णास्तव मी तुला सांगतोः इची बहुत पाप सोडलीं आहेत, कांकी इने फार प्रीति केली; पण ज्याला थोडके सोडलें तो थोडकी प्रीति करतो." मग त्याने तिला ह्मटले: “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हां संगती बसणारे आपणांमध्ये ह्मणूं लागलेः “जो पापांची क्षमा देखील करतो तो हा कोण?" त्याने बायकोला झटले. “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा."

  • ) ही पापी बायको मारया माग्दलीणी असावी असे प्राचीन काळापासून खिस्ती

मंडळीने अनुमान केले आहे. प्रक० १23.बेथेसदा नामक तलावाजवळील रोगी माणूस. (योह० ५.) त्यानंतर यहूद्यांचा सण होता तेव्हां येशू यरूशलेमास गेला. यरूशले- मांत तर मेंढरे दरवाज्याजवळ तळे आहे त्याला इबी भाषेत बेथेस्दा ह्मणतात, त्याला पांच मंडप आहेत, त्यांमध्ये रोगी, अंधळे, लंगडे, लुळे, यांचा मोठा समुदाय पाणी हालण्याची वाट पाहत पडला होता. कारण दूत वेळोवेळ तळ्यांत उतरून पाणी हालवीत असे आणि पाणी हालविल्यानंतर जो प्रथम त्यांत जाई त्याला कोणताही रोग लागला असला तरी तो बरा होत असे. तेथे ३८ वर्षे दुखणेकरी असा कोणी एक माणूस होता. त्याला