पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५८ याईराची कन्या आणि एक रोगी बायको. [प्रक० १२१ इंद्रिय व अवयव ही आपल्या ताब्यात घेत असे, आणि त्यांचा अयोग्य व विपरीन कार्याकडे उपयोग करवीत असे. खीरत हा जो "सतानाची सर्व कामे मोडायास भाला" (२ योह० ३, ८.) त्याने सर्वत्र सैतानाच्या या भयंकर शक्तीपासून भूतग्रस्तांस वरें केलें. +) हा विचारा मनुष्य आपल्यातूनच हे वोलला असे नाही, तर ज्या दुष्ट भाग्यांनी त्याला हस्तगत करून घेतले होते त्यांच्या मनातली गोष्ट न्याने सांगितली. प्रक० १२१. याईराची कन्या आणि एक रोगी बायको. - (मात्थी ९. मार्क ५. लुका ८.) मग येशू तारवांत बसून पुन्हा पार गेल्यावर त्याजवळ मोठा समुदाय मिळाला. तेव्हां पाहा, याईर नामें सभेचा एक अधिकारी येऊन त्याच्या पायां पडून फार विनंती केलीः "हे गुरू, माझी कन्या मरायास टेकली आहे, आपण येऊन तिजवर हात ठेवावे ह्मणजे ती वाचेल." मग तो त्याच्या बरोबर गेला आणि मोठा समुदाय त्याच्या मागे चालला, आणि त्यांनी त्याला चेंगरले. आणि कोणी एका बायकोला १२ वर्षांचा रोग होत होता, तिने बहुत वैद्यांच्या हातून फार सोसून आपले सर्व खचिले, तरी कांहीं गुण न येतां उलटै दुखणे अधिक झाले. ती समुदायांत याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या कांठाला शिवली. लागलीच पीडा जाऊन मी बरी झाले असा तिला शरीरांत अनुभव आला. तेव्हांच येशू बोललाः "मला कोण शिवला?" सर्व नाही ह्मणत असतां पेतर बोललाः "प्रभू , समुदाय तुला चैगरतात, आणि मला कोण शिवला असें ह्मणतोस काय? येशू ह्मणालाः “कोणी तरी मला शिवला, कांकी माइयांतून सामर्थ्य निघाले, हे मला ठाऊक आहे." मग बायको, मी गुप्त राहिले नाही, असे पाहून कांपत आली आणि त्याच्या पुढे पडून कोणत्या कारणाकरितां आपण त्याला शिवली व तेव्हांच कसी बरी झाली हे तिने सर्व लोकांच्या देखतां त्याला सांगितले. त्याने तिला ह्मटले"मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे; शांताने जा." तो बोलत आहे इतक्यांत सभेच्या अधिकाऱ्याच्या एथून येऊन कोणी त्याला सांगितले की: "तुझी कन्या मेली; गुरूला श्रम देऊ नको." पण येशू त्याला ह्मणालाः "भिऊ नको, विश्वास मात्र धर झणजे ती वांचेल." मग त्याच्या घरी आल्यावर त्याने गलबला म्हणजे अतिशय रडणारे यांस पाहून ह्मणालाः "तुह्मी कशाला रडतां? मूल