पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५६ कोडी, वातरोगी आणि कपरणाहुमांतील शतपति. [प्रक० ११९ होत, ते आपल्या अंतःकरणांत असा विचार करीत होते की: "हा या प्र- कारें दुर्भाषणे कां बोलतो? एक जो देव त्यावांचून कोणाच्याने पापांची क्षमा करवती ?" तेव्हां येशूने त्यांचे विचार जाणून त्यांस मटले: “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे वातरोग्याला बोलणे, किंवा ऊठ आपली बाज उचलून चाल असे बोलणे, यांतून कोणते सोपें? पण पृथ्वीवर मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करायास अधिकार आहे हे तुह्मी जाणावे." तेव्हां तो वातरोग्याला ह्मणालाः “मी तुला सांगतो, ऊठ, आपली बाज उचलून आपल्या घरी जा." लागलाच तो उठला व आपली बाज उचलून सर्वांच्या देखतां निघाला. यावरून सर्व लोक थक्क झाले, आणि देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला ह्मणून त्याची स्तुति करूं लागले २. त्यानंतर येशू पुन्हा कपरणाहुमांत गेला. तेव्हां कोणी एका शत- पतीचा जो चाकर त्याला प्रिय होता, तो दुखणाईत होऊन मरणास टेकला. त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांस त्याजकडे पाठवून आपण माझ्या चाकरास वाचवावे असी त्याला विनंती केली. त्यांनी येशूकडे येऊन त्याला आग्रहाने विनंती केली कों: "ज्यावर हा उपकार करायाचा तो योग्य आहे; कारण तो आमच्या लोकांवर प्रीति करतो*), आणि त्याने आमासाठी सभास्थान बांधले आहे." मग येशू यांबरोबर गेला. तेव्हां शतपतीने त्याकडे मित्रांस पाठवून त्याला झटले. “हे प्रभू श्रम करूं नको, खा माझ्या छावणीखाली यावे, असा मी योग्य नाही, यामुळे म्या आपणाला तुजकडे येण्यास योग्य मोजले नाही. परंत तं शब्द' बोल ह्मणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी हाताखालचा माणूस असतां माझ्या स्वाधीन शिपाई आहेत, आणि एकाला जा-असे सांगतो झणजे तो जातो, आणि दुसऱ्या- ला ये-ह्मणजे तो येतो, आणि माझ्या चाकराला अमुक कर-ह्मणजे तो करतो"1). हे ऐकून येशू त्याविषयी आश्चर्य पावला आणि लोकांला ह्मणालाः " मी तुह्मास खचीत सांगतों, इस्राएलांतही एवढा विश्वास मला आढळला नाहीं." आणि शतपतीला तो ह्मणालाः "जा, खा विश्वास धर- ल्याप्रमाणे तुला होवो.” आणि त्याच घटकेस त्याचा चाकर बरा झाला.

  • ) हा शतपति इस्राएल लोकांना मतानयायी होता (प्रक० १०००२).

1) शतपतीच्या बोलण्याचा अर्थ हाच की, जसे माझ्या हाताखालचे चाकर माइया आज्ञेत आहेत, तसें सृष्टीतील सर्व सत्र व शक्ति ही वीरताच्या आज्ञेत आहत.