पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ११९] कोडी, वातरोगी आणि कपरणाहुमांतील शतपति. २५५ झाडाला चांगले फळ येत नाही ते तोडून अमीत टाकतात. तर त्यांच्या फळांवरून तुह्मी त्यांस ओळखाल. जो कोणी मला प्रभू प्रभू (केवळ) गणतो तो आकाशाच्या राज्यांत जाईल असे नाही, तर जो माझ्या आका- शांतील बापाच्या इच्छेप्रमाणे करतो तो जाईल." "तर जो कोणी माझ्या या गोष्टी ऐकून त्यांप्रमाणे करील त्याला मी शहाण्या माणसा- सारखे लेखीन; त्याने आपले घर खडकावर बांधले; मग पाऊस पडला पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाहीं, कारण साचा पाया खडकावर घातला होता. परंतु जो कोणी माझ्या या गोष्टी ऐकून त्यांप्रमाणे करीत नाहीं तो मूर्ख माणसासारखा होईल, त्याने आपले घर बाळूवर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हां ते पडले व त्याचा मोठा नाश झाला."- आणि येशूने या गोष्टी संपविल्यावर समुदाय याच्या उपदेशावरून थक्क झाले, कारण त्याने शास्त्यांसारखा नाही, तर अधिकार असल्यासारखा त्यांस उपदेश केला. प्रक० ११९. कोडी, वातरोगी आणि कपरणा- हमांतील शतपति. (मात्थी ८. मार्क १ व २. लूका ५ व ७.) १. आणि कोणी एक कोडी येशूकडे आला आणि त्यापुढे गुडघे टेकन त्याने त्याला विनंती करून मटले की: "मला शुद्ध करायाची तला इच्छा असली तर शक्ति आहे." तेव्हां येशूला कळवळा येऊन तो हात पढे करून त्याला शिवला व ह्मणालाः "माझी इच्छा आहे, शुद्ध हो!" तेव्हांच त्याचे कोड गेले व तो शुद्ध झाला. नंतर काही दिवसांनी तो फिरून कपरणाहुमांत गेला, आणि तो घरी आहे असे ऐकण्यांत आले. मग चौघांनी उचललेला असा एक वातरोगी त्याकडे लोक घेऊन आले आणि दाटीमुळे त्याजवळ त्यांच्याने जाववेना, ह्मणून तो होता तेथील छावणी त्यांनी काढून वातरोग्याला बाजेसहित खाली सोडले. नही येश त्यांचा विश्वास पाहून वातरोग्याला ह्मणाला: "मुला. तझ्या पापांची क्षमा झाली आहे !" पण शाख्यांतील कित्येक तेथे बसले