पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काइन आणि हवेल. [प्रक०४ दारासी पाप टपलें आहे; आणि त्याची इच्छा तुजवर होईल, पण तूं यावर अधिकार कर." _*) आदाम व हब्बा ही दोघे पापांत पडली होती, तेव्हां कातड्यांची वस्त्रे देवाने त्यांस नेसविली. त्यावरून असे अनुमान होने की पापाचे प्रायश्चित्त होण्याचा खीस्ताकडून जो उपाय त्याचं प्रतिरूप दाखविण्याकरितां देवाने स्वतां पशयज्ञ करणें स्थापिले असावे. "विश्वासेंकरून हवेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अपिला.” इब्री २२,१. सूचना. देवाला शोधून आपणांस त्याला सोपून देतात आणि तारण साधून घेतात असे कोणी आहेत, आणि आपली मान ताठर करून देवाला सोडून देतात असेही कोणी आहेत. न्यायकाळी जे निंदण शत्रूने पेरिले आणि प्रभूने जो गहूं पेरिला त्यापासून ते वेगळे केले जाईल तोपर्यंत वरचे दोन वर्ग मनुष्यजातींत सांपडतील, आणि आदामाचे पहिले दोन पुत्र ह्या दोन वर्गाचे पुढारी झाले आहेत, असे झटले असतां चालेल. २. मग काइन आपल्या हबेल भावाला बोलता झाला, आणि शेतांत होते तेव्हां काइनाने आपल्या हबेल भावावर उठून त्याला जिवे मारिलें. नंतर परमेश्वर काइनाला बोलला : “तुझा भाऊ हबेल कोठे आहे ?" तेव्हां तो बोलला : "मला ठाऊक नाही? मी आपल्या भावाचा संभाळणारा आहे काय?" मग परमेश्वर बोलला: "त्वा काय केले? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी भूमीतून मजकडे ओरडती. तर आतां तूं शेत करसील तेव्हां ती आपले सत्व यापुढे तुला देणार नाहीं; पृथ्वीवर तूं परागंदा व भटक्या होसील." मग काइन परमेश्वराला ह्मणालाः "माझा दंड सोसवेल यापेक्षा मोठा आहे आणि असे होईल की, ज्या कोणाला मी सांपडेन तो मला जिवे मारील." तेव्हां परमेश्वर त्याला बोलला : “कोणी काइनाला जिवे मार- ल्यास त्याचा सूड सातपट घेतील.” आणि त्याला पाहून कोणी ठार मारूं नये ह्मणून परमेश्वराने काइनावर खूण ठेवली. ३. आणि काइनाची बायको गरोदर होऊन हनोखाला प्रसवली, तेव्हां तो नगर बांधीत होता, आणि नगराचे नांव आपल्या पुत्राच्या नांवा प्रमाणे हनोख असे त्याने ठेवलें. हनोखाच्या वंशांत पुढे लेमेख झाला. त्याने आपणाला दोन बायका घेतल्या, एकीचे नांव आदा व दुसरीचे