पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५४ येशूचा डोंगरावरील उपदेश.-चालू. प्रक० ११८ सांगतो; आपण काय खावे व काय प्यावें असी आपल्या जिवाविषयी काळजी करूं नका. आकाशांतील पक्ष्यांकडे पाहा, ती पेरीत नाहीत, कापीत नाहीत व कोठारांमध्ये सांठवीत नाहीत, तरी तुमचा आकाशांतील बाप त्यांस खायास देतो; तुमी त्यांपेक्षा श्रेष्ठ आहां की नाही? आणि वस्त्रांविषयीं कां काळजी करितां? रानांतील फुलझाडे कसी वाढतात हे लक्षात आणा; ती श्रम करीत नाहीत व कांतीत नाहीत; तरी मी तुह्मास सांगतो की, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवांत त्यांतल्या एका सारखाही त्याला नव्हता. तर आपण काय खावे, किंवा काय प्यावे, किंवा काय पांघरावे असे ह्मणून काळजी करू नका, कांकी या अवध्यांची काळजी विदेशी (मूर्ति- पूजक) करतात; या सर्वांची गरज तुह्मास आहे, हे तुमच्या आकाशां- तील बापाला ठाऊक आहे. तुह्मी तर पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे न्यायर्यापण मिळवायास झटा ह्मणजे ती सर्व तुह्मास मिळतील. ह्मणून उद्यांची काळजी करू नका, कांकी उद्यांची काळजी उद्यां करील; ज्या दिवसाचे जे दुःख ते त्याला पुरे.". ___७. “कोणी तुह्मास दोष लावू नये ह्मणून तुह्मी दोष लावू नका; कारण ज्या प्रकारे तुझी दोष लावतां त्या प्रकारे तुह्मास दोष लावतील आणि ज्या मापाने तुमी मोजून देतां त्याने तुह्मास मोजून देतील. तूं आपल्या डो- ळ्यांतले मुसळ ध्यानांत न आणतां आपल्या भावाच्या डोळ्यांतले कुसळ कां पाहतोस? अथवा तूं आपल्या भावाला कसे ह्मणसील की तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे! आणि पाहा, तुझ्या डोळ्यांत मुसळ आहे. अरे ढोग्या, तूं पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढ, तेव्हां आपल्या भावाच्या डोळ्यांतले कुसळ काढायास तुला साफ दिसेल" (प्रक० ४२ क०४).-"मागा ह्मणजे तुह्मास मिळेल, शोधा ह्मणजे तुह्मास सांपडेल. ठोका ह्मणजे तुह्मास उघडेल. माणसांनी ज्या रीतीने तुमासी वर्तीवें ह्मणून तुमची इच्छा आहे त्याच रीतीने तुमीही त्यांसी वर्ता." ८. “अरुंद दरवाज्याने आंत जा; कांकी नाशाकडे जाण्याचा दर- वाजा रुंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यांत जाणारे बहुत आहेत. का- रण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे, आणि ज्यांस तो सांपडतो ते थोडके आहेत."_" प्रत्येक चांगल्या झाडाला चांगली फळे येतात, पण वाईट झाडाला वाईट फळे येतात. ज्या ज्या