पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ११८] येशूचा डोंगरावरील उपदेश.-चालू. २५३ ५. "लोकांनी पाहावे अशा हेतूने तुह्मी आपला धर्म त्यांच्या समोर करूं नये याविषयी जपा, नाहीतर तुमच्या आकाशांतील बापापासून तुह्मास फळ मिळणार नाही. तूं तर धर्म करीत असतां तुझा उजवा हात काय करतो है तुझ्या डाव्या हाताला कळू नये, असे की तुझा धर्म गुप्तांत व्हावा, आणि गुप्तांत पाहणारा तुझा बाप तुला लौकिकांत फळ देईल."-आणि तूं प्रार्थना करसील तेव्हां ढोग्यांसारखा होऊं नको; कारण आपण माणसांस दिसावे, ह्मणून सभास्थानांत व चव्हाट्यांत उभे राहून प्रार्थना करणे हे यांस अवडते. मी तुह्मास खचीत सांगतो की, त्यांस त्यांचे फळ मिळते. तूं तर प्रार्थना करसील तेव्हां आपल्या खोलीत जा, आणि आपले दार लावून तुझा बाप जो गुप्तांत आहे त्याची प्रार्थना कर, आणि गुप्तांत पाह- णारा तुझा बाप तुला लौकिकांत फळ देईल. पण तुह्मी प्रार्थना करीत असतां विदेशी (मूर्तिपूजक) यांसारखी व्यर्थ बडबड करूं नका, कां की आपल्या फार बोलण्यामुळे आपले मागणे मान्य होईल असे त्यांस वाटते. यास्तव या प्रकारे प्रार्थना कराः "हे आमच्या आकाशांतील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो! तुझें राज्य येवो! जसे आकाशांत तसे पृथ्वीवर- ही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो! आमची रोजची भाकर आज आमास दे! आणि जसे आह्मी आपल्या ऋण्यांस सोडतो तसे तूं आमचों ऋणे आह्मा- स सोड! आणि आमास परीक्षेत नेऊं नको, तर आह्मास वाइटापासून सोडीब! कां की राज्य आणि पराक्रम आणि महिमा ही सर्वकाळ तुझी आहेत! आमेन' प्रक० ११८. येशूचा डोंगरावरील उपदेश.- चालू. ६. "जेथे कसर व कलंक नाश करतात, आणि चोर फोडून चोरी करतात, तेथे पृथ्वीवर तुह्मी आपल्याकरितां संपत्ति सांठवं नका. तर आकाशांत जेथे कसर व कलंक नाश करीत नाहीत आणि चोर फोड़न चोरी करीत नाहीत तेथे आपल्याकरितां संपत्ति सांठवा. कां की जेथे नमची संपत्ति आहे तेथे तुमचे चित्तही लागेल. कोणाच्याने दोन धन्यांची करी करवत नाहीं; कां की तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीति कीलः अथवा एकाचा पक्ष धरील व दुसऱ्याची उपेक्षा करील: तमच्याने देवाची आणि धनाची सेवा करवत नाही. यास्तव मी तमाम