पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५२ येशूचा डोंगरावरील उपदेश. [प्रक० ११७ तुझें संपूर्ण शरीर नरकांत पडूं नये हे तुला बरे आहे. आणि तुझ्या उजव्या हाताने जर तुला अडखळविले तर तो तोडून आपणापासून टाक; कां की तुझ्या अंगांतून एकाचा नाश व्हावा, आणि तुझे संपूर्ण शरीर नरकांत पडूं नये हे तुला बरे आहे." ४. “अणखी प्राचीन लोकांस सांगितले होते की, खोटी शपथ वाहूं नको. मी तर तुह्मास सांगतो, शपथ वाहूंच नको; अकिाशाची नको, कांकी ते देवाचे आसन आहे, पृथ्वीचीही नको, कांकी ती त्याच्या पायांचे आसन आहे; यरूशलेमाचीही नको, कांकी ते मोठ्या राजाचे नगर आहे. आपल्या मस्तकाचीही शपथ वाहूं नको, कांकी तुझ्याने एक केस पांढरा किंवा काळा करवत नाही. तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाहीं असे असावे; पण याहून में अधिक तेंदुष्टापासून होते."-"डोळ्या- बद्दल डोळा व दांताबद्दल दांत असे सांगितले होते, हे तुह्मी ऐकिले आहे. मी तर तुह्मास सांगतो, दुष्टाला आडवू नको, तर जो कोणी तुझ्या उज- व्या गालावर तुला मारील त्याकडे दुसराही फिरीव, आणि जो तुझा वादी होऊन तुझा अंगरखा घ्यावयास पाहतो त्याला तुझे उपवस्त्रही घेऊ दे; आणि जो कोणी तुला बलात्काराने एक कोस नेईल त्याबरोबर दुप्पट चाल. जो तुजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुजपासून उसने घ्यायास पाहतो याला पाठमोरा होऊ नको." "आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर, आणि आपल्या वैयचा द्वेष कर (प्रक० ४२ पाहा ) असे सांगितले होते हैं तुमी ऐकिलें आहे. मी तर तुह्मास सांगतो, तुह्मी आपल्या वै-यांवर प्रीति करा, जे तुह्मास शाप देतात यांस आशीर्वाद द्या; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, आणि जे तुह्मास गांजतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांसाठी प्रार्थना करा. असे की तुह्मी आपल्या आकाशांतील बापाचे पुत्र व्हाल, कांकी तो वाइटांवर व चांगल्यांवरही आपला सूर्य उगववितो, आणि न्यायींवर व अन्यायींवर- ही पाऊस पाडतो. कारण जे तुह्मावर प्रीति करतात त्यांवर जर तुह्मी प्रीति करतां तर तुमाला फळ काय? जकातदारही तसेंच करतात का नाही? यास्तव जसा तुमचा आकाशांतील बाप पूर्ण आहे, तसे तुह्मी पूर्ण व्हा."