पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५१ प्रक० ११० येशूचा डोंगरावरील उपदेश. २. "तुह्मी पृथ्वीचे मीठ आहां; पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल? ते बाहेर टाकून माणसांनी तुडवावें यावांचून पुढे कोणत्याही कामास उपयोगी नाही.- तुह्मी जगाचा उजेड आहां. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. कोणी दिवा लावून मापाखाली ठेवीत नाहीत, तर समईवर ठेवतात, मग जे घरांत आहेत त्या सर्वांवर त्याचा प्रकाश पडतो. माणसांपुढे तुमचा उजेड असा प्रकाशो की, यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या आकाशांतील बापाचा महिमा वर्णावा.—नियमशास्त्र किंवा भविष्यशास्त्र रह करायास मी आ- लो असे समजू नका; मी रह करायास नाही, तर पूर्ण करायास आलो आहे. कारण मी तुह्मास खचीत सांगतों, आकाश व पृथ्वी टळून जाई तोवर सर्व पूर्ण झाल्यावांचून नियमशास्त्रांतील एक काना किंवा एक फांटाही टळून जाणारच नाही." ३. "हत्या करूं नको, जो कोणी हत्या करील तो न्यायकाळी दंडास योग्य ठरेल, असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुमी ऐकिलें आहे. मी तर तह्मास सांगतो की, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागें भरेल तो न्यायकाळी दंडास योग्य ठरेल, जो कोणी आपल्या भावाला वेडगळ ह्मणेल तो न्यायसभेत दंडास योग्य ठरेल, जो कोणी अरे मूर्खा, असे ह्मणेल तो नरकामीच्या दंडास योग्य ठरेल. ह्मणून ला आपले अर्पण वेदीजवळ जर आणले, आणि माझ्या भावाला मजविरुद्ध कांहीं आहे असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथे वेदीपुढे आपले अर्पण ठेव व निघन जा. पहिल्याने आपल्या भावासी समेट कर, आणि मग येऊन आपले अर्पण वाहा. तूं आपल्या वाद्याच्या संगती वाटेत (आयुष्यमार्गात ) आहेस तोवर त्यासी लवकर समेट कर, नाही तर वादी तुला न्यायाधी- शाच्या हाती देईल आणि तूं बंदीशाळेत पडसील. मी तुला खचीत सांगतो, तं शेवटली दमडी फेडसील तोपर्यंत तेथून सुटणारच नाहीस." ___ "व्यभिचार करूं नको, असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुह्मी लेकिले आहे, मी तर तुह्मास सांगतो की, जो कोणी बायकोकडे काम- टष्टीने पाहतो, त्याने आपल्या अंतःकरणाने तिजसी व्यभिचार केलाच हे तझ्या उजव्या डोळ्याने जर तुला अडखळविले तर तो उपटन आपणापासून टाक, कां की तुझ्या अंगांतून एकाचा नाश व्हावा, आणि