पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० । येशूचा डोंगरावरील उपदेश. प्रक० ११७ ५. लूका १०. त्यानंतर प्रभूने अणखी ७० जण नेमून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवायास व दुखणाईतांस बरे करावयास नगरोनगरी व गांवोगांवीं पाठविले आणि त्यांस मटले : “पीक फार आहे खरे, परंतु कामकरी थोडे आहेत, यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या पिकांत काम- करी पाठवावे ह्मणून त्याची प्रार्थना करा.”—बहुत बायकांनीही त्याजवर विश्वास ठेवला आणि त्या आपल्या द्रव्याने त्याची सेवा करीत असत. सूचना. बारा शिष्य हे सर्व सोडून निरंतर येशूपासीं राहत असत; परंतु ते सत्तर जण बहुतकरून आपल्या कामधंद्यामध्ये राहत आणि विशेष प्रसंगी त्याची सेवा करीत. जसी १२ प्रेषितांची संख्या इस्राए- लाच्या १२ वंशांचे अनुरूप आहे, तसी ७० सुवार्तिकांची संख्या पृथ्वीं- तील ७० राष्ट्रांचे अनुरूप आहे असे कित्येकांचे मत आहे. (उत्प०१०). प्रक० ११७.येशचा डोंगरावरील उपदेश. (मात्थी ५-७.) १. आणि येशू संपूर्ण गालिलांत त्यांच्या सभास्थानामध्ये उपदेश करीत व राज्याची सुवाग सांगत व लोकांतले सर्व रोग बरे करीत फिरला. तेव्हां लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालले. मग समुदायांस पाहून तो डोंगरावर जाऊन बसला आणि उपदेश करूं लागला की: “जे आ- ल्याने दीन*) ते धन्य, कारण आकाशाचे राज्य यांचे आहे, जे शोक करतात ते धन्य, कारण ते शांतवन पावतील. जे नम्र ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.—ज्यांस न्यायीपणाची भूक व तहान लागली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील.--जे दयाळू ते धन्य, कारण त्यांवर दया होईल.-जे अंतःकरणाने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.- जे समेट करणारे ते धन्य, कारण त्यांस देवाचे पुत्र ह्मणतील.-न्यायी- पणामुळे ज्यांच्या पाठीस लागतात ते धन्य, कारण आकाशाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हां तुमची निंदा करतील व पाठीस लागतील व माझ्या- करितां तुह्माविरुद्ध सर्व वाईट गोष्टी लबाडी करून बोलतील तेव्हां तुमी धन्य आहां.” " ) आत्म्याने दोन ते हेच की, आम्ही आपणांकडून काहींच नाही, आपणामध्ये सन्व- गुण व शक्ति मुळीच नाही, असं कबूल करून आणि देवाच्या कृपेवर टेकून देवाच्या सहा- याने जे चालतात नेच आहेत.