पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४९ प्रक० ११६] येशूचे शिष्य. करितां नेमले आणि त्यांस त्याने प्रेषित (पाठविलेले) असे नांव दिले. त्या बारा प्रेषितांची नावे तर येणेप्रमाणे आहेत: १.शिमोन पेतर, हा बेथसाइ- दांतील मासे धरणारा योना याचा पुत्र. २. त्याचा भाऊ अंद्रय. ३. योहान, ४. त्याचा भाऊ याकोब (वडील). ५. फिलीप. ६. बार्थलमी. ७. थोमा. ८.माथी किंवा लेवी. ९. याकोब (धाकटा), हा आलफी व मारया (येशूच्या आईची बहीण) यांचा पुत्र, ह्मणून तो प्रभूचा भाऊही मटला आहे. १०. याकोबाचा भाऊ यहूदा. ११. शिमोन कनानी, आणि १२.यहूदा इस्करयोते. ४. लका ९. आणि असे झाले की, ते एका दिवसीं वाटेने चालत असतां कोणी एकाने येशूला मटलेः "हे प्रभू, जेथे जेथें तूं जासील तेथे मी तुझ्या मागे येईन." येशू त्याला ह्मणालाः "कोकडांस बिळे व आकाशांतल्या पांखरांस कोटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकें टेकण्यासही ठिकाण नाहीं."-मग त्याने दुसऱ्याला सांगितले: "माझ्या मागे ये." पण तो बोललाः “प्रभू, पहिल्याने माझ्या बापाला पुरायास मला जाऊ दे.” येशूने त्याला मटलैः “मेलेल्यांस आपल्या मेलेल्यांस परूंदे, पण तूं जाऊन देवाच्या राज्याची वार्ता सांग."-अणखी एक ह्मणालाः "हे प्रभू, मी तुझ्यामागे येईन, पण पहिल्याने माझ्या घरांत- ल्यांचा निरोप मला.घेऊ दे." येशूने त्याला ह्मटलेः "जो कोणी नांग- राला आपला हात घालून मागे पाहतो, तो देवाच्या राज्यास उपयोगी नाहीं॥ सचना, जो कोणी देवाच्या राज्यांतील सेवक व्हावयास इच्छितो त्याने जगासंबंधी सर्व विचार एकीकडे ठेविले पाहिजेत.-स्वाभाविक मनष्य (आल्याने मेलेले) यांस जगीक कामाहून योग्य किंवा मोठे काम तूचत नाही, तर त्यांच्या बुद्धीने जे प्रिय व कर्त्तव्य असे त्यांस दिसते तेही देवाच्या सेवकाला एकीकडे ठेवावे लागते. आईबाप, सोयरेधायरे. यांजविषयींची कर्तव्यकमें मोठी आहेत खरी, परंतु प्रसंगानुसार देवाच्या ज्यांत जाण्यासाठी किंवा त्याची सेवा करण्यासाठी तीही लहान भी मानली पाहिजेत. उगीच वेळ न गमवितां मांस व रक्त यांच्या अनुमतावांचून वागावे हे अवश्यक आहे, 32 1