पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४८ येशूचे शिष्य. [प्रक० ११६ तारवांत होते, त्यांनी येऊन आपले सहाय करावे ह्मणून त्यांनी त्यांस खुणा विले. ते आले आणि त्यांनी दोन्हीं तारवे इतकी भरली की ती बुडूं लागली. शिमोन पेतर हे पाहून येशूच्या पायां पडून बोललाः “हे प्रभू, मजपासून जा, कारण मी पापी माणूस आहे,"-कांकी त्याला व त्याजवळ- च्या सर्वांस विस्मयाने व्यापले, आणि त्याचा भाऊ आंद्रया व शिमोनाचे भागीदार याकोब व योहान यांसही तसेच झाले. तेव्हां येशू त्यांस ह्मणालाः "माझ्या मागें या, ह्मणजे मी तुह्मास माणसे धरणारे करीन." मग ते तारवे कांठी लावून सर्व सोडून त्याच्या मागे चालले. २. मात्थी ९. मार्क २. लूका ५–नंतर काही दिवसांनी येशू निघून पुन्हा समुद्राकडे गेला. तेव्हां सर्व समुदाय त्याजवळ आला आणि त्याने त्यांस उपदेश केला. आणि जवळून जातांना त्याने लेवी, ज्याला मात्थीही ह्मणतात, त्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला मटले : "माझ्या मागे ये." तेव्हां तो सर्व सोडून उठून त्याच्यामागे चालला. नंतर लेवीने आपल्या घरी त्याच्यासाठी मोठी जेवणावळ केली. तेव्हां बहुत जकातदार व पापीहे येशू व त्याचे शिष्य यांबरोबर जेवायास बसले. तेव्हां शास्त्री व परोशी यांनी त्याला जकातदार व पापी यांबरोबर जेवि- तांना पाहून त्याच्या शिष्यांस ह्मटले: “जकातदार व पापी यांजबरोबर तुमचा गुरु कां जेवतो?" *) मग येशूने ऐकून त्यांस पटले: “निरोग्यांस वैद्याची गरज नाही, तर दुखणाईतांस आहे. मी नीतीमानांस नाही तर पाप्यांस पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो." __*) रोमी सरकारची जकातीची बाब होती, आणि न्या सरकारांतून कोणी जकातीचा मक्ता घेत असत त्यांच्या पोटात दुसरे लोक मक्ता घेत, आणि हे पोट मक्तेदार जकात घेत असत, ह्मणून त्यांस जकातदार असे झटले आहे. आपण त्या विकारलेल्या अन्यधर्मी (रोमी) लोकांस जकात द्यावी हें यहूदी लोकास अतिशय वाईट वाटत असे, आणि जकात- दार लोक बहुतकरून अन्यायाने व जुलुमाने जकातीचा पैसा वसूल करीत असत यामुळे- ही ते त्यांचे फारच द्वेषी होते. यहूदी लोकांपैकी जर कोणी जकातदार झाला तर त्यास धर्मभ्रष्ट मानन त्याला भजनगृहांत येऊ देत नसत. याप्रमाणे जकातदार व पापी यांस सारखे मोजीत होते. ३. मात्थी १०. मार्क ३.लूका ६.-आणि येशूने आपल्या शिष्यांस बोलाविले व त्यांतून बारा जण निवडून त्यांस उपदेश करण्यास पाठवाया-