पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ नाजरेथांतील सभास्थानात येशूचा संवाद. प्रक० ११५ नाहीं है बरै बोललीस; कारण तुला पांच नवरे झाले आहेत, आणि आतां जो तुझ्याजवळ आहे तो तुझा नवरा नाही." बायको त्याला ह्मणालीः "महाराज, तूं भविष्यवादी आहेस असे मला दिसते. आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर (गरिजीम डोंगरावर. प्रक० ९१ क० २. टीका आणि ८२ क० २. पाहा) भजन केले, परंतु भजन करण्याचे ठिकाण यरूशलेमांत आहे असे तुह्मी ह्मणतां." येशूने तिला मटले "तुह्मी कशाचे भजन करतां हे तुह्मास ठाऊक नाहीं, आह्मी कशाचे भजन करतो हे आह्मास ठाऊक आहे, कांकीं यहूद्यांतूनच तारण आहे. परंतु खरे भक्त आल्याने व सत्याने बापाला भजतील, असी वेळ येती व आतां आली आहे, कारण बाप आपल्या अशा भजणाऱ्यांस शोधतो. देव आत्मा आहे, आणि जे त्याला भजतात त्यांनी आल्याने व सत्याने त्याचे भजन केले पाहिजे." बायको त्याला ह्मणाली: "मशीहा ह्मणजे खीस्त येत आहे हे मला ठाऊक आहे, तो आल्यावर आ- ह्मास सर्व गोष्टी सांगेल." येशूने तिला मटले: “तोच मी तुजसी बोलत आहे.” तेव्हां बायकोने आपली घागर ठेवून नगरांत जाऊन मनुष्यांस मटले : "चला, जी कामे म्या केली ती अवघीं ज्याने मला सांगितली त्या माणसाला पाहा, तोच खीस्त आहे की नाहीं." आणि शोमरोन्यांनी त्याकडे येऊन आपण आमच्या संगतीं राहवे, असी त्याला विनंती केली, आणि तो तेथे दोन दिवस राहिला. तेव्हां बहुतांनी बायकोला झटले: "आतांपासून तुझ्या बोलण्यामुळेच आह्मी विश्वास धरतो असे नाही, कारण आमी स्वतः ऐकिले, आणि हा खचीत जगाचा तारणारा खीस्त आहे असे आह्मास ठाऊक झाले.” प्रक० ११६. नाजरेथांतील सभास्थानांत येशूचा संवाद. (लूका ४.) आणि येशू लहानाचा मोठा झाला तेथे नाजरेथांत गेला आणि आप- ल्या चालीप्रमाणे शाब्बाथ दिवसीं सभास्थानांत जाऊन वाचायास उभा राहिला, तेव्हां यशाया भविष्यवाद्याचे पुस्तक त्याला दिले, आणि त्याने ते पुस्तक उकलून जे ठिकाण काढले तेथे असे लिहिले होते: (यशा०६१,१.२.) "प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगायास त्याने मला अभिषेक केला आहे. भमहृदयाच्यांस बरे करायास; पाडाव केले-