पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ११४] . शोमरोनी बायको. २४५ की त्याजवर जो कोणी विश्वासतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व- काळचे जीवन व्हावे. कां तर देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता पुत्र यासाठी दिला, की जो कोणी त्यावर विश्वासतो, त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकाळचे जीवन व्हावे. कांकी जग अन्यायी ठरविण्यासाठी नाही, तर जगाचे तारण त्याजकडून व्हावे, ह्मणून देवाने आपल्या पुत्राला जगांत पाठविले. जो त्यावर विश्वासतो, तो अन्यायी ठरत नाही, परंतु जो विश्वासत नाहीं, तो आतां अन्यायी ठरलेला आहे. कांकी त्याने देवाच्या एकुलत्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवला नाहीं. आणि अन्यायी ठरणे हेच आहे की, जगांत प्रकाश आला असतां माणसांनी प्रकाशापेक्षां अंधाराची अवड अधिक धरिली." प्रक० ११४. शोमरोनी बायको. (योह० ४.) १. आणि येशू यहूदा सोडून फिरून गालिलांत गेला; त्याला तर शोम- रानांतून जावे लागले. तेव्हां शखार नामे नगर तेथे तो आला. तेथे याको- बाची विहीर होती; तर येशू चालतां चालतां दमलेला तसा त्या विहिरी- वर बसला, त्या वेळेस शोमरोनांतली एक बायको पाणी काढायास आली. येशू तिला ह्मणालाः “मला प्यायालादे." ती बायको त्याला ह्मणाली: "तूं यहूदी असून मी शोमरोनी बायको त्या माझ्याजवळ प्यायाला कसे माग- तोस?" ( यहूदी तर शोमरोन्यासी वहिवाट करीत नाहीत ). येशूने तिला उत्तर दिले: “देवाचे जे दान ते आणि मला प्यायाला दे, असे तला ह्मणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर खा त्यापासीं मागि- तले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते"*). बायको त्याला ह्मणाली: "महाराज, तुलापोहरा नाही आणि विहीर खोल आहे, तर तुज- जवळ ते जिवंत पाणी कोठून असेल?” येशूने तिला झटले: “जो कोणी हे पाणी पितो त्याला पुन्हा ताहान लागेल, पण जे पाणी मी देईन ते जो कोणी पिईल त्याला सर्वकाळपर्यंत ताहान लागणारच नाही." बायको त्याला प्रणाली "महाराज, मला ताहान लागू नये आणि एथे काढायास म्या येऊ नये, ह्मणून ते पाणी मला दे."

  • ) खीस्त जे जिवंत पाणी देतो ते त्याचे शुभवर्तमान आहे.

२येश बायकोला ह्मणालाः "जा, तूं आपल्या नवऱ्याला बोलावून इकडे ये,गायकोने मटले "मला नवरा नाही." येशूने तिला मटले "मला नवरा