पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ निकदेम. [प्रक० ११३ प्रक० ११३. निकदम. (योह० ३.) १. यहूदांचा एक अधिकारी (न्यायसभेतील एक) परोश्यांतील मा- णूस निकदेम नामें होता, तो रात्री येशूकडे जाऊन त्याला ह्मणालाः "गुरू, तूं देवापासून आलेला उपदेशक आहेस, है आह्मास ठाऊक आहे, कारण हे जे चमत्कार तूं करतोस, ते देव त्यासंगती असल्यावांचून कोणा- च्याने करवणार नाहीत." येशूने त्याला उत्तर दिले की: "मी तुला खचीत खचीत सांगतो, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्यावांचून कोणाच्याने देवाच्या राज्यांत जाववत नाही. जे देहापासून जन्मले, ते देह आहे, आणि जे आत्म्यापासून जन्मले, ते आत्मा आहे. तुह्मास पुन्हा जन्मले पाहिजे, हे म्या तुला सांगितले ह्मणून नवल मानूं नको. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा शब्द ऐकतोस, परंतु तो कोठून येतो व कोठे जातो हे तुला कळत नाहीं; जो कोणी आत्म्यापा- सून जन्मला तो तसाच आहे"* ).

  • ) देह ह्या शब्दाचा नव्या करारांत बहुतेक ठिकाणी जो अर्थ होतो तो येणेप्रमाणे:

देवाने मनुष्याला उत्पन्न करता वेळी त्याच्यामध्ये जे सद्गण ठोविले होते ते आदामाच्या पापाने विघडन जे अवगुण झाले त्यासंबंधी में पाप मनुष्यामध्ये आहे त्याला देह असी संज्ञा दिली आहे. आत्मा या शब्दांत जो अर्थ येतो तो हाचः खीरताचा जो उद्धार या- कडून जे काही देवापासून मनुष्याला प्राप्त होते तें, किंवा त्याचे न होणे ते सर्व आत्मा या शब्दाच्या अर्थात येते. शारीरिक जन्मेकरून आपण देह आहों, आणि देह असतां आदा- माचे पाप व त्याचा दंड याचे आपण भागीदार आहो. खीस्ताच्या उद्घाराकडून आप- णास पुन्हा (आत्मिक रीतीने) जन्मायाचे आहे. यासाठीं की जसें आदामाचं पाप व दंड याचं आपण भागीदार झालो.तसें खीस्ताची पवित्रता व न्यायीपण यांचेही आपण भागीदार व्हावे. पाण्यापासन व आत्म्यापासून हा जो पुनर्जन्म यावांचून खीस्ताच्या मणण्याप्रमाणे कोणाच्याने तारण पाववत नाहीं (प्रक० १६८ पाहा). २. निकदेमाने त्याला ह्मटले: “या गोष्टी कशा होतील?" येशूने त्याला उत्तर दिले की: "तूं इस्राएल लोकांचा उपदेशक असून या गोष्टी जाणत नाहींस काय? मी तुला खचीत खचीत सांगतो की जेआह्मास ठाऊक आहे ते आह्मी सांगतो, आणि जे आह्मी पाहिले त्याविषयी साक्ष देतो, परंतु तुह्मी आमची साक्ष घेत नाही. जसा मोश्याने रानांत साप उंच केला, (प्रक० ४६ क ० ३.) तसे मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे, यासाठी