पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ काना नाम गांवांतील लग्न आणि देवळाची शुद्धि. [प्रक० ११२ नेल बोलला की: "हे गुरू, तूं देवाचा पुत्र आहेस, तूं इस्राएलाचा राजा आहेस.” येशू त्याला ह्मणालाः "म्या तुला अंजिराच्या झाडाखालीं पा- हिले हे तुला सांगितले, यावरून विश्वास धरलास काय? याहून मोठी कामें पाहसील. मी तुह्मास खचीत सांगतो, यापुढे आकाश उघडलेले आणि देवाचे दत चढतां व मनष्याच्या पत्रावर उतरतां पाहाल"

  • ) मशीहा वेथलहेमांतून निघणार असें मीखा भविष्यवाद्याने भविष्यकथन केले

होते (प्रक० ८१ क ०२.), न्याची अठवण करून नथानेल असे वोलला असावा. प्रक० ११2. काना नामें गांवांतील लग्न आणि देवळाची शुद्धि. (योह ० २.) १. आणि तिसऱ्या दिवसी गालिलांतील काना एथे लग्न होते, तेव्हां येशूची आई तेथे होती. येशू व त्याचे शिष्यही या लग्नास बोलाविलेले होते. त्या वेळेस द्राक्षारस सरल्यावर येशूची आई त्याला ह्मणाली: "त्यां- च्या जवळ द्राक्षारस नाहीं.” येशूने तिला झटले : "बाई, माझा व तुझा काय संबंध? *) माझी घटका अझून आली नाही. त्याची आई चाकरांस ह्मणाली: “जे कांहीं तो तुह्मास सांगेल ते करा." तेथे तर यहूदयांच्या शुद्ध करण्याच्या रीतीप्रमाणे पाण्याच्या सहा दगडी कुंड्या, दोन दोन किंवा तीन तीन मण मावत, अशा ठेविल्या होत्या. येशूने त्यांस झटले: “कुंड्या पाण्याने भरा." तेव्हां त्यांनी त्या तोंडोतोंड भरल्या. मग त्याने त्यांस सांगितले: “आतां काढून जेवणकारभान्याकडे न्या." मग पाण्याचा झालेला द्राक्षारस जेवणकारभाऱ्याने चाखला, आणि तो कोठून आहे हे ठाऊक नव्हते (पाणी काढणाऱ्या चाकरांस तर ठाऊक होते). तेव्हां जेवणकारभारी नव-याला बोलावून त्याला ह्मणाला: "प्रत्येक मनुष्य चांग- ला द्राक्षारस पहिल्याने वाढतो, मग बहुत प्याल्यावर निरस वाढतो, परंतु खा चांगला द्राक्षारस आतांपर्यंत ठेवला आहे."-येशूने हा चमत्काराचा प्रारंभ गालिलांतील काना एथे केला,आणि आपला महिमा प्रगट केला, आणि त्याच्या शिष्यांनी त्याजवर विश्वास ठेवला.

  • ) ग्रीस्त मशीहा असतां लोकांसमोर जेव्हां प्रसिद्ध झाला, तेव्हापासून तो आपल्या

आईचाही उद्धारक, प्रभव तारणारा असा झाला. हा बोध होण्याकरिता या प्रसंगी येशू आपल्या आईसी बोलत असता तिला "आई" नाही, तर "बाई" असे म्हणाला,