पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० येशूचा बाप्तिस्मा व परीक्षा. [प्रक० १२० आकाशांतून असी वाणी झाली की: "हा माझा प्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे." 1*) येशूला स्वतांच्या पापांविषयीं दुःख करायाची गरज होती म्हणून त्याने पश्चा- त्तापाचा बाप्तिस्मा घेतला असे काही नाही, तर जगाच्या पापांचा दंड भरायाला आणि त्यांसाठी प्रायश्चित्त करायाला ज्या अर्थी त्याने पतकरले होते. त्या अर्थी आमच्या पापाविषयीं दुःख करायास त्याने पश्चात्तापराचा वाप्तिस्मा घेतला. २. नंतर येशूची सैतानाकडून परीक्षा व्हावी ह्मणून त्याला आत्म्याने रानांत नेले*). आणि तो ४० दिवस व ४० रात्री उपासी राहिल्यावर त्याला भूक लागली. आणि परीक्षक यापासीं येऊन बोललाः "तूं देवाचा पुत्र असलास तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या ह्मणून सांग." येशूने उत्तर दिलेः “मनुष्य केवळ भाकरीने वांचेल असे नाही, तर जे कांहीं वचन देवाच्या तोंडांतून निघेल तेणेकडून वांचेल.”—मग सैतानाने त्याला पवित्र नगरांत नेले, आणि देवळाच्या कंगोऱ्यावर त्याला उभे करून मटले: “तूं देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कांकी असे लिहिले आहे : तो आपल्या दूतांस तुजविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यासी आपटू नये ह्मणून ते तुला हातांनी धरतील." येशूने त्याला झटले: “अणखी लिहिले आहे: प्रभु जो तझा देव त्याची परीक्षा पाहूं नको.”—फिरून सैतानाने त्याला फार उंच डोंगरावर नेले, आणि जगांतील सर्व राज्ये व त्यांचे वैभव ही त्याला दाखवून मटले "जर तूं पायां पडून मला नमसील तर हे सर्व तुला देईन.' तेव्हां येशू याला ह्मणालाः “अरे सैताना, दूर हो, कांकी प्रभु तुझा देव याचे नमन कर व याचीच सेवा कर, असे लिहिले आहे" + ). तेव्हां सैतान त्याला सोडून गेला आणि दूत येऊन त्याची सेवा करूं लागले.

  • ) पहिला आदाम परीक्षेत टिकला नाही, या कारणास्तव त्याने जे बिघाडले,ते पूर्वस्थितींस

आणणारा खीस्त जो दुसरा आदाम, त्याचीही सैतानाकडून परीक्षा व्हायाचे अगत्य होते. t) जसे पहिल्या मनुष्याच्या परीक्षेत सैतानाने दुष्ट वासना, ह्मणजे देहाची वासना, डोळयांची वासना आणि संसाराची बढाई यांविषयों सचविले, त्याचप्रमाणे खीरताची परीक्षा करत बेळेसही त्याने या गोष्टींकडे वळावं हाणन सतानाने यत्न केला.