पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ११०] येशूचा बाप्तिस्मा व परीक्षा. २३९ रलें नाहीं, परंतु "मी खील नाहीं"असे पतकरले. मग त्यांनी त्याला विचा- रिलेः "तूं एलिया आहेस काय?" (मला० ४,५. प्रक० ९३ क०४ पाहा.) तो ह्मणाला " मी तो नाही." ते ह्मणाले: “तर तूं कोण आहेस? ज्यांनी आमास पाठविले त्यांस आह्मी उत्तर द्यावे, ह्मणून तूं आपणाविषयी काय माणतोस?" तो बोललाः “यशाया भविष्यवाद्याने सांगितल्याप्रमाणे 'प्रभूचा मार्ग नीट करा,' असी रानांत ओरडणाऱ्याची वाणी मी आहे." मग त्यांनी त्याला विचारले: “जर तूं खीस्त नाहीस व एलिया नाहीस तर बाप्तिस्मा कां करतोस?" त्याने त्यांस उत्तर दिले: “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु ज्याला तुझी जाणत नाही असा एक तुह्मामध्ये उभा आहे; जो माझ्या मागून येऊन माझ्या पुढे झाला, ज्याच्या वाहणांचे बंद सोडायास मी योग्य नाहीं तो पवित्र आत्म्याने व अमीने बाप्तिस्मा करील. सचना. पुढे खीस्ताने जो बाप्तिस्मा नेमला (प्रक० १६८.) तो योहा- नाच्या बाप्तिम्याहून निराळा आहे. योहान्नाचा बाप्तिस्मा केवळ पाण्याचा होता, परंतु ख्रीस्ताचा बाप्तिस्मा पाण्याचा व आत्म्याचा आहे. योहानाचा बाप्तिस्मा तारण पावण्यासाठी तयार होण्या- करितां पश्चात्तापाचा होता, परंतु खीस्ताचा बाप्तिस्मा हा, सिद्ध झालेले जे तारण ते विश्वासाकडून प्राप्त करून घेण्याचा बाप्तिस्मा आहे. अग्नीच्या बाप्तिस्याविषयींचे वचन पन्नासाव्या दिव- साच्या सणाच्या दिवसी पूर्ण झाले आहे (प्रक० १७१ क ० २). प्रक० ११०. येशूचा बाप्तिस्मा व परीक्षा. (माथी ३ व ४. मार्क १. लूका ३ व ४.) १. आणि येशू सुमारे तीस वर्षांचा व्हावयास आला, तेव्हां तो यार्दे- नेस योहान्नाकडे त्यापासून बाप्तिस्मा घेण्याकरितां आला, पण योहान याला मना करून ह्मणाला: "मला तुजपासून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, आणि तूं मजकडे येतोस काय?" येशूने त्याला उत्तर दिले की: "व्हां होऊ दे, कांकी या प्रकारे सर्व न्याय पूर्ण करणे हे आह्मास योग्य आहे. तेव्हां त्याने त्याचे होऊ दिले. आणि येशू पाण्यांतून तेव्हांच वर आला आणि पाहा, त्यासाठी आकाश उघडले आणि योहान्नाने देवा. च्या आत्म्याला पारव्यासारखं उतरता व त्यावर येतां पाहिले. आणि