पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ बाप्तिस्मा करणारा योहान याचा उपदेश व साक्षी देणे. [प्रक०१०९ प्रक० १०९. बाप्तिस्मा करणारा योहान याचा उपदेश व साक्षी देणे. (मात्थी ३. मार्क १. लूका ३, योह ० १.) १. तिबेरय केसर याच्या अधिकाराच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहूदाचा अधिकारी असतां, आणि हेरोद (अंतिपास ) गालिलाचा राजा असतां जखर्याचा पुत्र योहान्न, याला रानांत देवाचे वचन प्राप्त झाले. तेव्हां तो पापांची क्षमा होण्यासाठी जो पश्चात्तापाचा बाप्तिस्मा, तो गाज- वीत यार्देनेच्या चहुंकडल्या सर्व प्रांतांत जाऊन ह्मणालाः “पश्चात्ताप करा. कांकी आकाशाचे राज्य जवळ आले आहे." योहान्न तर उंटाच्या लवेचे वस्त्र पांघरलेला होता, आणि त्याच्या कमरेस कातड्याचा कमर- बंद होता, आणि तो टोळ व रानमध खात असे. तेव्हां यरूशलेम व सर्व यहूदा यांतील लोक निघून त्याजवळ गेले, आणि त्यांनी आपली पा पदरी घेऊन यार्देन नदीत त्यापासून बाप्तिस्मा घेतला. परोशी व सदोकी यांतीलही बहुत त्याजवळ आले आणि त्यांस तो बोललाः "अहो सापांच्या पिलानो, जो क्रोध होणार त्यापासून पळायास तुह्माला कोणी सुचविले? तर पश्चात्तापास योग्य जी फळे ती द्या! आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे आपल्या मनांत मानू नका! कांकी मी तुह्मास सांगतो, अब्राहामास या दगडांची लेकरें करायास देव समर्थ आहे. आतांच तर झाडाच्या मुळावर कु-हाड ठेवली आहे, ह्मणून ज्या ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते." २. आणि लोक योहान्नाविषयीं हाच खीस्त असेल काय? असा सर्व आपल्या अंत:करणांत विचार करीत असतां त्याने सर्वांस बटले: “पश्या- तापासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करितो खरा, परंतु जो माझ्या मागून येतो तो मजपेक्षां समर्थ आहे, त्याच्या वाहणांचे बंद सोडायास मी योग्य नाहीं, तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. त्याचे सूप त्याच्या हातांत आहे आणि तो आपले खळे अगदी निर्मळ करील. गहूं तो आपल्या कोठारांत सांठवील, पण भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील." आणि बाप्तिस्मा करणारा योहान याची साक्ष हीच आहे; जेव्हां यहूद्यांनी यरूशलेमाहून याजक व लेवी यांस पाठवून स्याला विचारले की: "तू कोण आहेस?" तेव्हां त्याने पतकरले व नाका-