पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १०८] खीलाचे तारुण्य. २३७ रात्री घेऊन मिसर देशांत गेला*). तेव्हां मागी लोकांनी मला फसविले, हैं जाणन हेरोद फार रागे भरला, आणि त्याने मागी लोकांपासून जी वेळ नीट विचारून घेतली, त्या वेळेप्रमाणे बेथलहेमांत व त्याच्या सग- ल्या सीमांत जे बाळक दोन वर्षांचे व त्याहून धाकटे होते, त्या सर्वांस त्या- ने माणसे पाठवून जिवे मारिले.-मग हेरोद मेल्यावर प्रभूचा दूत मिसर देशांत योसेफास स्वप्नांत दिसून ह्मणालाः "ऊठ, बाळक व त्याची आई यांस घेऊन इस्राएल देशांत जा, कांकी बाळकाचा जीव घ्यायास जे पाहत होते ते मेले आहेत." तेव्हां तो इस्राएल देशांत येऊन नाजरेथ नामें नगरांत जाऊन राहिला. -*) मागी लोकांपासून जी दाने मिळाली होती, ती या प्रसंगी त्यांस फार उपयोगी पडली. प्रक० १०८. स्त्रीस्ताचें तारुण्य, (लूका २, ४१-५२.) आणि तो वाळक वाढला व आल्याने बलवान् होऊन ज्ञानेकरून पूर्ण झाला, आणि देवाची कृपा त्यावर होती. आणि प्रतिवर्षी त्याचे आईबाप वल्हांडण सणाला यरूशलेमास जात असत. आणि तो बारा वर्षांचा झाला, तेव्हां ते त्या सणाच्या चालीप्रमाणे यरूशलेमास गेले. मग ते माघारे जात असतां तो मुलगा येशू यरूशलेमांत मागे राहिला. पण तो सोबत्यांत आहे असे समजून ते एका दिवसाची मजल गेले; नंतर नात- लग व ओळखी यांमध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांस सांपडला नाहीं, ह्मणून ते त्याचा शोध करीत यरूशलेमास माघारे गेले. मग तीन दिवसांनंतर तो देवळांत गुरूंच्या मध्ये बसून त्यांचे ऐकतां आणि त्यांस प्रश्नही करितां त्यांस सांपडला. त्याचे सर्व ऐकणारे तर त्याच्या बद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले. तेव्हां त्याची आई त्याला ह्मणाली. "मुला, खा आह्मासी असे कां केले? पाहा, तुझा बाप व मी कष्टी होऊन तझा शोध करीत आलो." त्याने त्यांस मटले: "माझा शोध का केला? जे माझ्या बापाचे त्यांत म्या असावे है तुह्मास ठाऊक नव्हते काय?" परंत त्याने त्यांस सांगितलेली गोष्ट ते समजले नाहीत. मग तो त्यांच्या संगतीं नोथास गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला. आणि त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणांत ठेवल्या. नंतर येशू ज्ञानांतर गीत आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत चालला,