पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १०५] पूर्व प्रदेशांतून आलेले मागी लोक. २३५ त्यावर पवित्र आत्मा होता. आणि "प्रभूचा खीस्त (अभिषिक्त) याला पाहिल्यापूर्वी तुला मरण येणार नाही" असी पवित्र आत्म्याने त्याला सूचना केली होती. तो त्या वेळेस आत्म्याने देवळांत आला; आणि आईबापांनी येश बाळकाला देवळांत आणले, तेव्हां त्याने त्याला आपल्या हातांवर घेऊन देवाची असी स्तुति केली की: "हे स्वामी, आतां तूं आपल्या वचना- प्रमाणे आपल्या सेवकाला शांतीने जाऊ देतोस, कारण जे तुझे तारण त्वा सर्व लोकांच्या देखतां तयार केले, ते म्या आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे: ते विदेश्यांस प्रकाश होण्यासाठी आणि तुझ्या इस्राएल लोकांच्या वैभवासाठी उजेड होईल! तेव्हां त्याविषयी सांगितलेल्या गोष्टींवरून योसेफ व त्याची आई यांस आश्चर्य वाटले. आणि शिमोनाने त्यांस आशी- र्वाद दिला आणि मारयेला मटले: “पाहा, बहुत अंत:करणाच्या कल्पना प्रगट व्हाव्या ह्मणून हा इस्राएलांत बहुतांचे पडणे व फिरून उठणे यासाठी, आणि ज्याचे विरुद्ध बोलतील असे चिन्ह यासाठी ठेविला आहे. आणि तुझ्या जीवांतूनही तरवार पार जाईल."-आणखी कोणी एक हान्ना नामें भविष्यवादीण होती, ती सुमारे ८४ वर्षांची विधवा असतां देऊळ न सोडून रात्रंदिवस उपासांनी व प्रार्थनांनी सेवा करीत असे. तीही त्याच वेळेस जवळ येऊन प्रभूची स्तुति करूं लागली, आणि यरू- शलेमांत जे खंडणीची वाट पाहत होते, त्या सर्वीस त्याविषयी बोलली. प्रक० १०७. पूर्व प्रदेशांतून आलेले मागी लोक. (मात्थी २.) १. हेरोद राजाच्या दिवसांत यहूदा देशांतील बेथलहेमांत येशू जन्मल्यानंतर पाहा, पूर्वेकडून कोणी मागी लोक ( ज्ञानी, विद्वान लोक यरूशलेमांत येऊन बोलले की: "यहूद्यांचा जो राजा जन्मला तो कोठे आहे? कांकी आह्मी पूर्व देशांत असतां त्याचा तारा पाहिला आणि त्याला नमन करायास आलो" *). है ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरूश- और घाबरले. मग राजाने शास्त्री यांस मिळवून त्यांजवळ पुसले की: वीस्ताचा जन्म कोठे व्हावा?" ते त्याला ह्मणाले: “यहूदा देशांतील बेथ. लहेमांत: कांकी मीखा नामें भविष्यवादाने असे लिहिले आहे की ते बेथलहेम एफ्राथा, तूं यहूदाच्या हजारांमध्ये असायाला धाकला असला