पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १०५] जगाचा तारणारा येशू खीस्त याचा जन्म. २३३ प्रक० १०६. जगाचा तारणारा येशू खोस्त याचा जन्म. (लूका २,१–२०.) आणि असे झाले की त्या दिवसांत सर्व जगाची नांवनिशी लिहावी अ- सी कैसर (बादशाहा) ओगूल याची आज्ञा झाली. तेव्हां सर्व लोक आपापल्या नगरांत नांवनिशी लिहून द्यायास गेले. आणि योसेफ आपली लग्नाची बायको मारया तिजबरोबर नांवनिशी लिहून द्यायास गालिलांतील नाजरेयाहून यहदांतील बेथलहेम नामें दावीदाचे नगर तेथे गेला, कारण तो दावीदाच्या घराण्यांतला व कुळांतला होता. आणि ती तेथे होती, तेव्हां प्रसूतीचे तिचे दिवस भरले. आणि ती आपला प्रथम पत्र प्रसवली आणि त्याला बाळंत्याने गुंडाळून गव्हाणींत तिने निजविले, कारण त्यांस उतारशाळेत जागा नव्हती. आणि त्याच प्रांतांत मेंढपाळ रात्रीं रानांत राहून आपले कळप राखीत होते. तेव्हां पाहा, प्रभूचा दूत त्यांच्याज- वळ उभा राहिला व प्रभूचे तेज त्यांच्या भोवतें प्रकाशले, आणि ते फार भ्याले. मग दूत त्यांस ह्मणाला : "भिऊं नका! कांकी पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होईल त्याची सुवार्ता मी तुह्मास सांगतो, की दावीदा- च्या नगरांत तुह्मासाठी आज तारणारा जन्मला आहे, तो खीस्त प्रभु आहे. आणि तुह्मास हीच खूण की बाळक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवि- लेले असे तुह्मास सांपडेल." मग एकाएकी आकाशांतल्या सैन्याचा समु- दाय त्या दूतांसंगतीं प्रगट झाला, त्यांनी देवाची स्तुति करीत मटले “परम- उंचांमध्ये देवाला महिमा, पृथ्वीवर शांति आणि मनुष्यांवर कपा!" आणि दूत त्यांपासून आकाशांत गेले, तेव्हां मेढपाळ एकमेकांस ह्मणा- ले: "चला, आपण बेथलहेमापावेतो जाऊं, आणि ही जी झालेली गोष्ट प्रभने आमास कळविली ती पाहूं." तेव्हां ते खरेने गेले आणि मारया व योसेफ व गव्हाणीत निजविलेले बाळक ही त्यांस सांपडली. मग त्यांनी पाहिल्यावर त्या बाळकाविषयीं जी गोष्ट आपणांस सांगितली होती, ती कळविली. आणि सर्व ऐकणाऱ्यांनी आपणांस मेंढपाळांनी सांगितलेल्या गोविषयीं आश्चर्य केले. पण मारयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंत:करणांत ठेवल्या. नंतर त्यांस सांगितले होते त्याप्रमाणे मेंढपाळ सर्व गोष्टी ऐकून व पाहून त्यामुळे देवाचा महिमा वर्णीत व स्तुति करीत माघारे फिरले. 30H