पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ बाप्तिस्मा करणारा योहान याचा जन्म. प्रक० १०४ घरास माघारी गेली.- आणि प्रभूचा दूत योसेफाला स्वप्नांत दिसून ह्मणाला? " योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू आपली बायको मारया इला घ्यायास भिऊ नको, ती पुत्र प्रसवेल, आणि वा त्याचे नाम येशू ठेवावे, कारण तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील." तसे योसेफाने मारया आपली बायको घेतली. प्रक० १०४. बाप्तिस्मा करणारा योहान्न याचा जन्म, (लूका १,५७-८०.) आणि अलिसाबेतीच्या प्रसूतीचे दिवस भरल्यावर ती पुत्र प्रसवली. आणि प्रभूने तीजवर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग तिच्या बरोबर आनंद करूं लागले. आणि ते त्याच्या बापाच्या नांवा- वरून बाळकाचे नांव जखर्या ठेवीत होते, परंतु त्याच्या आईने सांगितले की: "नका, त्याला तर योहान ह्मणायाचे आहे." ते ह्मणाले: "या नांवाचा तुझ्या नातलगांत कोणी नाही." मग “तुझ्या मनांत त्याला कोणते नांव द्यायाचे." असे त्याच्या बापाला त्यांनी खुणेने पुसले, तेव्हां साने पार्टी मागितली व "त्याचे नांव योहान आहे" असे लिहिले. आणि सर्वांस आश्चर्य वाटले. तेव्हांच त्याचे तोंड उघडले आणि तो देवाची स्तुति करीत बोलू लागला. आणि यहूदाच्या अवघ्या डोंगरवटीत या सर्व गोष्टीं- विषयी लोक बोलू लागले, आणि सर्व ऐकणाऱ्यांनी आपल्या अंतःकर- णांत ठेवून झटले: "हा बाळक तर कसला होईल ?" आणि प्रभूचा हात त्याला अनुकूळ होता. तेव्हां जखर्या पवित्र आल्याने पूर्ण होऊन त्याने असे भाविष्य सांगितले की: “इस्राएलाचा देव प्रभु सुवंदित असो! कारण याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी केली आहे. त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यांत तारणाचे शिंग तयार केले आहे. आणि बाळका! तुला परात्पराचा भविष्यवादी ह्मणतील. कारण प्रभूचे मार्ग तयार करण्याकरितां तूं त्याच्या तोडापुढे चालसील" (प्रक० ९३ क० ४)-बाळक तर वाढला आणि आत्म्याने बलवान होत गेला, आणि इस्त्राएलास त्याच्या प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो रानांत असे.