पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १०३] तारणान्याची आई मारया. २३१ प्रक० १०3. तारणाऱ्याची आई मारया, (लुका १,२६-५६.) १. नंतर सहाव्या महिन्यांत गालिलांतील नाजरेथ नामें नगर एथे गब्रीएल दूत एका कुमारीकडे देवाने पाठविला. ती कुमारी दावीदा- च्या वंशांतील योसेफ नामें पुरुषाला दिलेली होती, कुमारीचे नांव तर मारया होते. तेव्हां दूत तिजकडे आंत येऊन ह्मणाला : “हे कृपा पावलेली, सलाम, प्रभु तुजबरोबर असो, बायकांमध्ये तूं धन्य आहेस!" ती त्याला पाहून त्याच्या बोलण्यावरून फार घाबरली, आणि हा आशी- दि कसला आहे? असा विचार करू लागली. तेव्हां दूत तिला ह्मणालाः 'मारये, भिऊ नको. कारण की देवाची कृपा तुजवर झाली आहे. पाहा, तूं पुत्र प्रसवसील आणि त्वा त्याचे नांव येशू (तारणारा) ठेवावे. तो मोठा होईल व त्याला परात्पराचा पुत्र ह्मणतील, आणि प्रभु देव त्याचा बाप दावीद याचे आसन त्याला देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळ राज्य करील आणि त्याच्या राज्याचा शेवट होणार नाहीं" (प्रक० ६६ क० १). मारयेने दूताला झटले : "हे कसे घडेल ?" तेव्हां दूताने तिला उत्तर दिले की, “पवित्र आत्मा तुजवर येईल, आणि परात्पराची शक्ति तुजवर सावली करील, यामुळे जे पवित्र लेकरूं होईल त्याला देवाचा पुत्र ह्मणतील; कारण देवाला कोणतीही गोष्ट असाध्य नाही!" मारया ह्मणाली: “पाहा, मी प्रभूची दासी, तुझ्या बोलण्याप्रमाणे मला होवो!" मग दूत तिजपासून गेला. २. त्या दिवसांत मारया उठून डोगरवटीस यहूदांतील एका नगरांत गेली. आणि जखर्याच्या घरांत जाऊन तिने अलिसाबेतीला सलाम केला. आणि आलिसाबेत मारयेचा सलाम ऐकतांच पवित्र आल्याने पूर्ण होऊन मोठ्याने बोलली: "तूं बायकांमध्ये धन्य आहेस! आणि माझ्या प्रभूच्या आईने मजकडे यावे, है मला कोठून? विश्वास धरणारी धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टी पूर्ण होतील.” तेव्हां मारया बोलली: "माझा जीव प्रभूला थोर मानतो, आणि माझ्या तारणाऱ्या देवा- विषयी माझा आमा उल्हासला; कारण त्याने आपल्या दासीच्या नीचपणा- कटे पाहिले आहे. पाहा, आतांपासून सगळ्या पिठ्या मला धन्य ह्मणतील." मारया तर तिच्याजवळ सुमारे तीन महिन राहिली, मग ती आपल्या