पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३० तारणाऱ्याच्या पुढे आलेला योहान्न याचा बाप जखर्या. [प्रक०१०२ णाऱ्याचे तीन प्रकारचे हुद्दे, ह्मणजे भविष्यवादी, मुख्य याजक, आणि राजा, असे हुद्दे दर्शविणारे नांव आहे. प्रक० १०2. तारणाऱ्याच्या पुढे आलेला योहान्न याचा बाप जखर्या. (लूका १,५-२५.) यहूदाचा राजा हेरोद, याच्या दिवसांत जखर्या नामें कोणी याजक होता आणि त्याच्या बायकोचे नांव अलिसाबेत, असे होते. ती दोघे देवाच्या दिसण्यांत न्यायी आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व नेम यांप्रमाणे निर्दोष चालत असत, पण त्यांसलेकरूं नव्हते,आणि ती दोघे मातारी झाली होती.आणिअसें झाले की,जखर्या याजकपण करीत असतांत्याला चालीप्रमाणे देवळांत जाऊन धूप दाखविणे पडले, आणि धूप दाखविण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समु- दाय बाहेर प्रार्थना करीत होता ; त्या वेळेस त्याने प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा आहे, असा पाहिला. तेव्हां जखर्या पाहून घाब- रला. परंतु दूताने त्याला झटले: “जखर्या, भिऊ नको! कांकी तुझी प्रार्थना ऐकण्यांत आली व तुझी बायको अलिसाबेत तुजसाठी पुत्र प्रसवेल, आणि ला त्याचे नांव योहान ठेवावे. द्राक्षारस व दारू तो पिणार नाहीं (प्रक०४१ क०२); तो इस्राएल लोकांतील बहुतांस त्यांच्या प्रभू देवाकडे फिरवील, आणि प्रभूसाठी योग्य प्रजा तयार करावी ह्मणून तो एलीयाच्या आल्याने व सामर्थ्याने येऊन त्याच्यापुढे चालेल" (प्रक०९३ क ०४). तेव्हां जखर्या ह्मणालाः "हे कशावरून समजू? कारण मी मातारा आहे व माझी बायकोही मातारी झाली आहे.” दूताने त्याला उत्तर दिले की: "मी देवाच्या समोर उभा राहणारा गब्रिएल आहे, आणि तुला हे चांगले वर्त्त- मान सांगायास मला पाठविले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तूं मुका होसील, कांकी माझ्या गोष्टीवर खा विश्वास ठेविला नाही."-- तेव्हां जखर्याला देवळांत उशीर लागल्यावरून लोक आश्चर्य पावले, आणि बाहेर आल्यावर त्याच्याने त्यांसी बोलवेना. तेव्हां त्याला देवळांत दर्शन झाले आहे असे ते समजले.-- मग त्याच्या सेवेचे दिवस भरल्यावर तो आपल्या घरास गेला.