पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १००] विधर्मी राष्ट्रांविषयी विचार. २२७ आणि याशिवाय दुसरे असे बहुत होते की ते जरी अगदी यहूदी झाले नाहींत तरी मूर्तीपूजा सोडून यहूद्यांच्या सभास्थानांत ईश्वरभजनास जात आणि पवित्र लेख वाचीत, त्यांस "दरवाज्यांतील मतानुसारी" ह्मणत. "तझ्या दरवाज्यांतील जो तुझा विदेशी" ह्या जुन्या करारांतील शब्दां- वरून वरील संज्ञा त्यांस प्राप्त झाली असेल. तसेच शुभवर्त्तमान स्वीका- रण्यासाठी विदेशी राष्ट्रेही तयार झाली, आणि तारणाची सिद्धता होण्याचा जो काळ नेमला होता तो जसा इस्राएलासाठी तसा विधर्मी लोकांसाठीही आतां पूर्ण झाला. BRARY TOM सार्वजनिक वाचनालय खेड, (यु.)