पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ विधर्मी राष्ट्रांविषयी विचार. प्रक० १०० विटाळ होतो, असे त्यांचे मत असे. मशीहाविषयीं जी त्यांची आशा ती दैहिक व निर्बुद्धिपणाची होती. ढोंग करून ते आपणांस पुण्यवान मोजीत व तारणाच्या मार्गापासून बहकून जात.- तथापि सर्व लोक तसेच नव्हते. बहुत भक्तशील खरे इस्राएलीही होते, त्यांसाठी नियमशास्त्र आपणांस खीस्ताकडे पोहंचवायास गुरु होते, ह्मणून ते इस्राएलाचे शांत- वन (मशीहा, ख्रीस्त) यावर भाव ठेवून आशा धरीत आणि तारणाऱ्याच्या येण्याविषयी जी वचने दिली होती त्यांच्या पूर्ण होण्याची वाट गंभीरपणाने व उत्कंठेने पाहत असत. प्रक० १००. विधर्मी राष्ट्रांविषयों विचार. बाबेलाचा बुरूज बांधण्याच्या वेळेपासून विधर्मीलोक आपापल्या मार्गा- न चालले (प्रक०६ क०२. टीका पाहा); आणि जो परिणाम त्यांसाठी नेम- ला होता तो ते पावले. विधर्मी राष्ट्रांपैकी जी सुधारलेली होती ती आपले देव व भक्ति यांचा निरर्थकपणा, शून्यता व व्यर्थता यांविषयी सावध झाली. आणि आपल्या ज्ञानाने, किंवा सबुद्धीने,किंवा शहाणपणाने, किंवा सामर्थ्याने, किंवा नीतिमार्गानेही आपल्या जिवात्म्याचे तारण व शांति आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही, याविषयी त्यांची पूर्ण खात्री झाली. आणि त्यांच्या अंत:- करणांतील भावना आपल्या धर्मकृत्यांच्या योगाने तृप्त न होतां योग्य व उत्तम तरणोपाय प्राप्त करून घेण्यासाठी ते उत्कंठित झाले.-देवाने इस्रा- एली लोकांस निवडून घेणे, त्यांस वागविणे, त्यांस शीक्षण व शासन करणे व यांस वचने देणे या सर्वांमध्ये देवाचेंजे सूत्र इस्राएलाच्या इतिहासांत पूर्ते- पणे प्रगट झाले त्याकडून इस्राएल लोक चोहीकडील राष्ट्रांतील लोकां- साठी रानांतील उपदेश करणान्याच्या वाणीसारखे झाले. आणि बाबे- लाच्या पाडावपणाच्या प्रवासाच्या समाप्तीपासून यहूदी लोकांनी सर्व देशांत पांगून आपापल्या ठिकाणी सभास्थाने बांधली, त्यांत ते शाब्बाथ दिवमी नियमशास्त्र व भविष्यशास्त्र वाचीत व त्यावर व्याख्याने देत, तेव्हां तारण- संपन्न इस्राएलाची जी आशा तिजविषयीं वर्तमान चोहीकडील विधर्मी राष्ट्रांच्या ऐकण्यांत आले. तेव्हां सगुण व खऱ्या देवाचे जे शोधणारे होते ते इस्राएलाच्या धर्माचे मर्म जाणून यहूदी झाले, आणि ज्यांनी संपूर्ण नियमशास्त्र पाळिले, त्यांस "न्यायीपणाचे मतानुसारी" असे ह्मणत असत.