पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ९९]- या कालमानांतील यहूदी लोकांची धर्मस्थिति. २२५ शास्त्रीय वर्ग उत्पन्न झाला आणि त्यांजकडे शास्त्रार्थ शोधून त्यावर टीका करून लोकांस ते उलगडून सांगणे हे काम होते. आणि लोक त्यांस राब्बी (गुरु) हे सन्मानदर्शक नांव देत असत. ते सर्व मोश्याचे नि- यमशास्त्राभिमानी असून अक्षरशःनियमशास्त्र पाळायास सांगत,असे केवळ नाही, तर नियमशास्त्रासंबंधी वडिलांचे सांप्रदायही कडकडीत रीतीने पाळण्याचा आग्रह करीत, यहूदी परागंदा होऊन यरूशलेमांतील देव- ळापासून दूर झाल्यामुळे त्यांनी आपापल्या ठिकाणी सभास्थाने स्थाप- ली. त्यांत ते शाब्बाध दिवसीं व सणाच्या दिवसी मंडळीमध्ये प्रार्थना करावी. नियमशास्त्र वाचावे आणि पवित्र लेखांवर शास्त्री लोक टीका करीत ती ऐकावी ह्मणून जमत असत. त्यांची विशेष धर्मकृत्ये, झणजे होम व यज्ञ करणे, धूप जाळणे व शुद्धि करणे हीं होती, परंतु ही सर्व यरूशले- मांतील मंदिरापासींच मात्र करायाची होती. २. मकाबी यांच्या दिवसांत परोशी व सदोकी यांचे दोन पंथ लोकां- मध्ये झाले. ज्यांच्या पंथांत बहुतकरून शास्त्री लोक होते, असे जे परोशी, ते मोश्याच्या नियमशास्त्राभिमानी व वडिलांच्या सांप्रदायाभिमानी असतां कोणी त्यांचे उल्लघन केले, तो लोकांपैकी असो किंवा अधि- काऱ्यांपैकी असो तर निःपक्षपाताने व धैर्याने ते त्याचा दोष त्याच्या पदरांत घालीत. तथापि दुसऱ्या अर्थी परोशी हे परम पवित्रतेविषयी वेषधारी व आपणांस न्यायी ह्मणविणारे ढोंगी असे होते. तरी संपूर्ण जुना करार ईश्वरप्रणीत देवाचे वचन आहे है मत ते अढळ मानीत असत, त्यांच्या धर्मसिद्धांतांत मेलेल्यांतून फिरून उठणे, शेवटचा न्याय होणे व सर्व- काळचे जीवन असणे हे त्यांचे मुख्य सिद्धांत होते. दुसरा पंथ सदोकी यांचा होता. त्यांनी केवळ मोश्याची पांच पुस्तके पत्करली होती. आणि पन्हा उठणें नाहीं, दूत नाहीत व आसाही नाही असे त्यांचे मत होते. ते बहतकरून दुर्व्यसनी असून नास्तिक असत, त्यांच्या पंथांत बहुत संभावित व राजकुळांतले लोक होते.-साधारण लोकांचा समुदाय परोशी लो- कांकडे असे. ते त्यांस साधू असे मानून त्यांचा सन्मान करीत असत. आणि आपण अब्राहामाचे वंशज असून सर्वकाळचे जीवन आप- मस सहज प्राप्त होईल असा अभिमान धरून ते गर्विष्टपणाने वागत सर्व राष्टांतील लोकांस तुच्छ मानीत आणि त्यांसी वहिवाट केल्याने 29H