पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ या कालमानांतील यहूदी लोकांची धर्मस्थिति. प्रक० ९९ वर्षांत फिरून सर्व देशावर राजा झाला. हाही आपल्या आज्याप्रमाणेच भयं- कर रोगाने मेला(प्रक०२८० क०२) त्याचा पुत्र अग्रिप्पा(जो दुसरा) याला आपल्या बापाच्या अधिकारांतला एकच भाग ह्मणजे यार्देनेच्या पलि- कडील उत्तर प्रांत हा राजपदवीसुद्धा मिळाला, आणि यहूदा,शोमरोन, गा- लील व पेरया हे चार प्रांत फिरून रोमी अधिकान्यांच्या अमलांत आले (इ. स०४४ वें वर्ष,) अग्रिप्पा हा यरूशलेमाचा नाश झाल्यावरही जिवंत होता. हेरोदी यांची वंशावळी. अंतीपातर, इतुरायाचा आणि (यहूदाचा अधिकारी. हेरोद मंगनस. अलेक्षांदर व अरिष्टोवूल; -अर्खलाव व अंतिपात;--फिलीप. हेरोद अग्रिप्पा १; हेरोदिया. हेरोद अग्रिप्पा २; बरनीके, द्रुसिला. प्रक० १९. या कालमानांतील यहूदी लोकांची धर्मस्थिति. १. बाबेलाच्या पाडावपणाच्या प्रवासांतून यहूदी परत आले, तेव्हांपासून त्यांनी आपणांसाठी व्यवस्थापक न्यायसभा नेमली, त्यांत सत्तर सभासद असत. त्यांच्या अध्यक्षस्थानी मुख्य याजक असे. लोकांची व्यवस्था कर- ण्याच्या कामांत जे सत्तर वडील मोश्याचे साह्य करीत होते (प्रक०४३ क०१) त्या अनुमानाने एजा याने ही न्यायसभा पहिल्याने स्थापली असावी असे वाटते. ह्या सभेकडे जी कामें होती त्यांत मुख्य धर्मसंबंधी व्यवस्था करण्याचे काम असून कोणा अपराध्यास देहांत शिक्षा करण्याचाही त्यांस अधिकार होता. परंतु यहूदा देश रोमी लोकांच्या अधीन झाला, तेव्हां- पासून हा अधिकार त्यांजपासून घेतला गेला.-जेव्हां भविष्यवाद्यांचे प्रगट होणे बंद झाले आणि भविष्यलेख मात्र लोकांपासी राहिले, तेव्हां