पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ९८ रोमी व हेरोदी. २२३ मास येऊन ते एका शाब्बाथ दिवसी हस्तगत करून घेतले. तो मंदि- रांत गेला, परंतु त्यांतील भांडारावर त्याने हात ठेवला नाही, आणि मंदिर स्वच्छ करवून पुढे यज्ञ करण्यास आज्ञा दिली. तथापि त्याने यरूशले- माचा कोट पाडून टाकण्याविषयी आज्ञा केली. अरिष्टोबूल याचा नातु हिरकान (दुसरा) याला त्याने अधिकारी व मुख्य याजक नेमले. याच्या निर्बळ अमलांत अंतिपातर, जो अदोमी इतुराया प्रांताचा अधिकारी, तो नामांकित झाला, आणि त्याला सीजर याने यहूदा प्रांतावर अधिकारी करून नमलें, अंतिपातर याहून त्याचा पुत्र हेरोद मंगनस नामें फार कीर्तिमान झाला. रोमी सरकारचा आश्रित असतांना त्याने मकाबी यां- च्या सर्व पिढ्यांचा क्षय केला, आणि इसवी सनापूर्वी ४० वर्षे अंतोनियस व अक्तावियस यांच्या शिफारसीने रोमी राज्यसभेकडून त्यास यहूदावर राज- पदवी मिळाली. हा हेरोद मोठा बुद्धिमान व फार शूर माणूस होता, परंतु पराकाष्ठेचा संशयखोर व क्रूर असता त्याने पुष्कळ निरपराधी असे केवळ साधारण मनुष्यांसच नव्हे, तर आपल्या पुत्रांवर देखील विश्वास न ठेवितां त्यांसही जिवे मारले. त्याच्या सर्व रीतीभाती विधर्मी लोकांच्या सारख्या होत्या. परंतु यहूदगांची मर्जी संपादण्याकरिता त्याने यरूशलेमांतील मंदिराची दुरुस्ती करून त्याला अपरिमित शोभा आणली. खीस्ताचा जन्म नुक्ताच झाला, तेव्हां ज्या भयंकर रोगाने अंतियख एपीफान मेला त्याच रोगाने हाही मेला (प्रक०९९क०३). २. त्यानंतर हेरोदाच्या तीन पुत्रांमध्ये देश वांटला गेला. अखलाव याला यहूदा, इतुराया व शोमरोन हे तीन प्रांत मिळाले. सहा वर्षांनंतर तो पदभ्रष्ट होऊन त्याचा देश रोमी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन झाला. हेरोद मंगनस याचा दुसरा पुत्र हेरोद अंतोपास याला गालील व पेरेया (यार्देन नदीच्या पलिकडील दक्षिण प्रांत) हे दोन प्रांत मिळाले, आणि त्याचा पुत्र फिलीप याला यार्देनेच्या पलिकडील देशाचा उत्तर भाग मि- ळाला. हा इसवी सनाच्या ३३ व्या वर्षी मृत्यु पावला, तेव्हा त्याचा अधिकार रोमी लोकांकडे झाला. इसवी सनाच्या ३९ व्या वर्षी हेरोद अंतीपास हा गाल देशांत देशपार होऊन त्याचा अधिकार बुडाला. तेव्हां सर्व देश रोमी अधिकारांत आला. परंतु हेरोद मंगनस याचा नातु हेरोद अग्निपर । जो पहिला) हा कैसर क्लौतीयस याच्या कृपेने इसवी सनाच्या ४१ व्या