पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ रोमी व हेरोदी. प्रक०९८ परंतु यहूदा आणि त्याचे सर्व भाऊ यांनी आपली सर्व लढाऊ माणसे जमविली, आणि सर्वांनी देवाची प्रार्थना केल्यावर यहूदाने शबूंच्या अंगा- वर जाऊन त्यांचा मोड केला. त्यानंतर यहूदा यरूशलेमास जाऊन पवित्रस्थान स्वच्छ करूं लागला, कारण की ते ओसाड होते व त्याच्या सभोवते सर्वत्र गवत माजलेले होते. नंतर नवव्या महिन्याच्या पंचविसा- व्या दिवसी त्याने फिरून होमवेदीवर यज्ञ केला. तेव्हां सर्व लोकांनी असा नेम केला की, प्रतिवर्षी याच दिवसांत आनंदाने व उपकारस्तुतीने पुन्हां- स्थापण्याचा सण पाळावा (इसवी सनापूर्वी १६५, वर्षे). २. आणि जेव्हा सुव्य देश यांतले अधिकारी फिरून त्रास देऊ लागले. तेव्हां यहूदाने साह्य मिळविण्याकरितां रोम्यांसी करार केला. तथापि ते त्याच्या साह्यास आले नाहीत. रोमी विधर्मी असता त्यांचे साह्य यहूदाने मागितले यावरून देवाची प्रसन्नता यहूदापासून निघाल्यासारखे दिस- ण्यांत आले. सुम्य देशांतील लोकांनी त्याचा अगदी मोड केला व तोलढायांत मेला (इ० स० पूर्वी २६१ वर्षे). त्याच्या ठिकाणी त्याचा भाऊ योनाथान झा- ला, त्याचा सुयांतील लोकांनी विश्वासघाताने प्राण घेतला. त्याचा तिसरा भाऊ शिमोन याला सीयोनाचा कोट विधर्मी लोकांपासून घ्यायास साधले. एवढा काळपर्यंत तो त्यांच्या हाती राहिला होता. त्याच्या दिवसांत देश स्वस्थ होता, आणि तो होता तोपर्यंत शांतिही राहिली. तेव्हां देव आमास खरा भविष्यवादी पाठवून देईल तोपर्यंत आमी अधिकारी व मुख्य याजक यांचा हुदा तुला व तुझ्या पिढीला वतन देऊ,असे लोकांनी उपकारबुद्धीने बोलून त्याप्रमाणे केले. त्याच्या मागे त्याचा पुत्र योहान हिरकान आला आणि त्याने स्तुत्य रीतीने अधिकार केला. त्याने शोमरोन व गालील प्रांत घेतला आणि गरिजीम डोंगरावर जें देऊळ होते ते त्याने मोडून टाकले. पुढे त्याचा पुत्र अरिष्टोबूल याला राजपदवी मिळाली (इ०स० पूर्वी १०६ वर्षे). प्रक०९८. रोमी व हेरोदी. १. आरिष्टोबूल याच्या संतानांनी अधिकाराविषयी आपसांत भांडण कले, तेव्हां त्या भांडणाचा निर्णय करण्याकरितां रोमी यांनी तिकडे ये- उन यहूदा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. पंपयस याने स्वतां यरूशले-