पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ९७ मकाबी. २२१ मोडसील तर मी तुला द्रव्य देऊन मोठ्या योग्यतेस चढवीन." परंतु हा आपला प्रयत्न निर्फळ आहे असे पाहून राजाने त्याच्या आईला त्यास मान्य करायास सांगितले. परंतु तिने आपल्या पुत्राला झटले: “अरे माझ्या प्रिय पत्रा, तुला मी दुःखाने प्रसवले आणि कष्टाने वाढविले आहे, ह्मणून त मजवर दया करून तुला जे फांसी देणारे त्यांस भिऊ नको, तर आपल्या भावांप्रमाणे आनंदाने मरण सोस, मणजे त्यांबरोबर देव तुलाही जिवंत करून तुह्मास मला परत देईल.” आई पुत्रासी बोलत आहे इतक्यांत पनाने आपला जीव घेणा-यांस मटले: “तुह्मी उशीर कां करतां ? ह्या जुलूमगाराला मी मान्य होईन असे तुह्माला वाटते काय?" मग राजाकडे वळून ह्मणालाः “अरे सर्व प्रकारे यहूदास त्रास देणाऱ्या, पर- मेश्वर जो आमचा देव, त्यापासून तूं निभावणार नाही." हे ऐकून राजा अगदी वेडा झाला, आणि त्या मुलाला आपल्या भावांपेक्षा अधिक दुख द्यायास सांगितले. तसा तोही भावभक्तीने आपल्या देवावर आशा ठेवून समाधान पावून मेला. शेवटी त्यांची आईही प्राणास मुकली. प्रक० ९७. मक्काबी. (१ मक्का० २ - १६.) १. अंतियखाने यहूद्यांचा पाठलाग केला त्यावेळी मोदीन नामें पर्वतावर कोणी मतथिया नामें याजक राहत होता. त्याच्यां व सर्व लोकांच्या देखतां कोणी यहूदाने निर्लज्जपणे जाऊन मूर्तीची जी वेदी मोदीनांत होती तिजवर यज्ञ केला. हे पाहून मतथियाला हृदयांतून बाण पार गेल्या- सारखे भासले, आणि नियमशास्त्राविषयी त्याचा आवेश प्रदीप्त होऊन त्याने जाऊन त्या यहूगाला जिवे मारिले आणि ती वेदी पाडून शहरांतन जातांना मोठ्याने हाका मारून झटले की: "ज्या कोणाला देवाचा करार पाळायाचा असेल, त्याने मजबरोबर नगरांतून यावे." तसा तो व त्याचे पत्र आणि बहुत भक्तशील लोक डोंगरवटीस पळून गेले. मग देशावरून जाऊन त्यांनी सर्व मूर्तीच्या वेद्या पाडल्या. नंतर मतथिया मेला (इसवी सनापूर्वी १६६ वर्षे), तेव्हां यहूदा मकाबी त्याचा वडील पुत्र आपल्या बापाच्या ठिकाणी झाला. तो गर्जणान्या सिंहासारखा धैर्य- "मोठा उत्कंठित होता. त्याचे सर्व शत्रु त्यासमोरून पळून गेले. तेव्हां अंतियख यहूदाांचा क्षय करण्याकरिता मोठे सैन्य जमवून आला.