पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० एल्यासर आणि सात भाऊ यांचे धैर्य. प्रक० ९६ आहे असे मानून त्याने ते सोसून घेतले. मग त्यांनी त्याला मटले: “ज्याला बाट नाहीं असें मांस आमी तुला आणं, परंतु ते डुकराचे मांस असल्या- सारखे दाखवून राजाकरितां तें खा, ह्मणजे तूं वांचसील.' परंतु तो साफ बोललाः "तुझी मला कबरेतील मातीमध्ये खुशाल मिळवा, कांकी म्या ढोंग करावे हे मला योग्य नाहीं; आणि पाहा, ९० वर्षांचा एल्यासर ताही अधर्मी झाला, असे बोलून अल्पवयांतील मनुष्यांनी मजविषयों अड- खळून ढोग करावे हे माझ्या मातारपणाला शोभत नाही, हे सर्वकाळ- पर्यंत मला लज्ज्यास्पद होईल. आणि जरी मी मनुष्याच्या शिक्षेपासून सुटलों तरी मला लाभ काय ? कारण की मी जिवंत असो किंवा मेलो, तरी माझ्याने देवाच्या हातापासून मला निभाववणार नाही." हे त्याने सांगित- ल्यावरून त्यास तेअनेक प्रकारे दुःख देऊन जिवे मारू लागले.आणि त्याने तेही धैर्याने व आनंदाने सोसिलें. असा तो मेला आणि आपल्या मरणा- कडून त्याने तरण्यांसच केवळ नाही, तर सर्व लोकांस नीतीने आचरण करावे याविषयी उदाहरण दाखविले. २. त्या वेळेस कोणी सात भाऊ होते, त्यांसही आपल्या आईसुद्धा त्यांनी धरून डुकराचे मांस खायास सांगितले. परंतु सर्वांनी झटले: “आह्मी मरूं. परंत आपल्या वडिलांच्या नियमशास्त्राविरुद्ध कधी करणार नाही." तेव्हां राजाने क्रोधयुक्त होऊन तत्क्षणीच त्यांस अति वेदना देऊन त्यांचा प्राण घेण्याकरितां लोखंडी पत्रे व कढया तापवायास सांगितले. तथापि स्या भावांनी धैर्याने मरण सोसण्याविषयी एकमेकांस उत्तेजन दिले. स्यांच्या आईने एका दिवसांत आपल्या सात पुत्रांस क्रमाने पराकाष्ठेच्या वेदना सोसून मरण पावतांना पाहिले. तरी तिची जी देवावर आशा होती तिजमुळे ती मोठी गंभीर व शांत राहून आपल्या सर्व पुत्रांत धैर्य देऊन एखाद्या शूर पुरुषाप्रमाणे त्यांस ह्मणालीः "तुह्मांस प्रसवणारी मी तमची आई आहे खरी, परंतु तुह्मास श्वास व प्राण देणारी मी नव्हे. आणि तुमचे अवयव म्या केले नाहीत, यास्तव जगाचा उत्पत्रकर्ता जो त्याच्या नियमशास्त्रासाठी तुह्मी आपला जीव द्याल, तर त्याच्याच कृपेने तो तुह्मा- ला परत मिळेल.' हे ऐकून ती आपल्या भाषेत माशी निंदा करिती, असे अंतियखाला वाटून त्याने तिच्या धाकट्या पुत्राला आपल्या जवळ घेऊन त्यासी गोड बोलून मटले: “जर तूं आपल्या वडिलांचे नियमशास्त्र