पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ९६] एल्यासर आणि सात भाऊ यांचे धैर्य, २१९ लोकांप्रमाणे वर्ते लागले. अणखी अंतियख स्वतां यरूशलेमास आला, तेव्हां त्याने मोठ्या उद्धटपणाने पवित्रस्थानांत जाऊन पवित्र पाने नेव- विली आणि फार नासाडी केली. मग दोन वर्षांनी एक पलटणी सर- दार त्याने यरूशलेमास पाठविला. त्या सरदाराने ढोंग करून शाब्बाथ दिवसापर्यंत मोठी शांति दाखविली. मग शाब्याथ दिवसांत त्याने नग- रावर अकस्मात् हल्ला करून नगराचे कोट पाडले, नगर लुटले, आणि पष्कळ मनुष्यांस ठार मारले. दावीदाचा कोट यांत त्याने दुष्ट शिपा- यांचे ठाणे ठेविले आणि त्यांनी यथेच्छ नाश केला. देवाचे मंदिर विटा- ळवन ते आपल्या ज्युपीटर ओलिप देवाचे देऊळ केले. शास्त्राच्या पोथ्या फाडून जाळून टाकल्या, आणि ज्यापासी देवाच्या कराराची पुस्तके सांपडतील आणि जे कोणी नियमशास्त्र पाळतील त्या सर्वांस जिवे मारावे, असी आज्ञा केली. यास्तव बहुत लोक शास्त्रापासून फिरले. तथापि पुष्कळांनी अढळ राहून देवाचा करार मोडण्यापेक्षा मरण सोसणे बरें असे पत्करले. कित्येक शाब्वाय पाळण्यासाठी गुप्तरूपे रानांतील गहेत जमून राहिले. परंतु ते प्रगट झाल्यावर त्याने त्यांस तसेच जाळून टाकले. ३. शेवटी अंतियख मोठ्या भयंकर मरणाने मरण पावला. त्याच्या पोटांत किटक उत्पन्न होऊन त्याचे अंग सडत चालले. तेव्हां हा दुष्ट परमेश्वराची प्रार्थना करूं लागला. आणि पवित्र नगराला स्वतंत्रता देईन, आपल्या नगरांतील लोकांसारखे यहूद्यांस वागवीन, पवित्र नगराला उंच उंच देणग्या देईन, आणि मी स्वतां यहूदी होईन असीं वचने देऊन त्याने बरे होण्याविषयी नवस केला. परंतु तो अति पीडा सोसून मृत्यु पावला. प्रक०९६. एल्यासर आणि सात भाऊ यांचे धैर्य. (२ मक० ६ व ७.) १. अणखी अंतियख एपीफान. याच्या दिवसांत नामांकित शास्त्यांपैकी एल्यासर नामे कोणी होता. तो जरी वृद्ध होता तरी संदर माणस होता. त्याने डुकराचे मांस खावे ह्मणून लोकांनी बलात्काराने त्याचे तोंड उघडिले. परंतु अधर्मात वाचण्यापेक्षां प्रतिष्ठितपणे मरण योग्य