पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ तिसरें सार्वभौम राज्य मणजे हेलेणी राज्य. प्रक० ९५ कर्ता माहीत नाही. ते कोणीएकाने शलमोनाच्या नीतीचे अनुल- क्षण केले आहे. ३. तोबीया याचे पुस्तक. यांत अश्शूर यांच्या पाडावप्रवास्यांपैकी एक भक्तशाल यहूदी होता त्याची गोष्ट, आणि त्या- वरून लेकरांस देवाच्या भयांत ठेवणे आणि नीतिसंपन्न करणे याचा परिणाम किती चांगला होतो हे दिसून येते. ४. येशूसीराख याच्या पुस्तकांत शलमोनाच्या प्रमाणे नीतिबोधपर उपदेश आहे.५. बारूखाचे पुस्तक. यांत बाबेलाच्या पाडावप्रवासांत जे लोक होते, त्यांस बोध केला आहे. बारूख हा इर्मयाचा सोबती होता. ६. माक्कापी यांची पुस्तके (प्रक०९६-९८). ७. एस्तेर इचे वेचे, यांत एस्तेरच्या पुस्तकाची पुरवणी आहे. ८. · दानीएलाच्या वृत्तांताची पुरवणी, यांत सुसन्न इची गोष्ट ; बाबेलाचा बेल; बाबेलाचा अजगर ; असार्याची प्रार्थना ; जळत भट्टीतील तीन मनुष्यांचे गायन, यांविषयीं वर्णन आहे. ९. मनाशे याची पश्चात्तापपर प्रार्थना. प्रक०.९८ तिसरें सार्वभौम राज्य ह्मणजे हेलेणी राज्य यांत यहृद्यांची स्थिति. (२ माक्क० ३-६ व ९.-१ माक्क० १). १. ज्या चार सार्वभौम राज्यांविषयी दानीएलाने भविष्यभाषण केलें- यांतील पहिल्या राज्याचा (बाबेलाचा) खोरेशाने नाश केला. माके दोन्यांतील अलेक्षंदर याने दुस-याचा (पारस्यांचा) क्षय करून तिसरें ह्मणजे ग्रीक सार्वभौमराज्य स्थापिलें. अलेक्षंदर याची यहृदयांवर कृपा- दृष्टि होती. तो मरण पावल्यावर पालेस्टैन देश, ग्रीकांचे ताबेदार मिसरी पतोलेमी नाम अधिकारी होते, त्यांजकडे झाला. त्यांच्या दिवसांतही यहूदी लोक स्वस्थतेने राहत आणि त्यांस आपल्या धर्माचे जे नेम व विधि होते त्यांप्रमाणे आचरण करायाला काही प्रतिबंध नसे. इसवी सनापूर्वी सुमारे २०० वर्षे सुन्या देशांतले (सेलयकी) अधिकारी यांनी पालेस्टैन देश घेऊन यहूद्यांवर महासंकट आणले, २. अंतियख एपीफान हा दुसऱ्या सर्व राजांहून अतिक्रूर होता. त्याने यहूद्यांस विधर्मी लोकांची रीतीभाती स्वीकारण्याची आज्ञा केली. ह्मणून बहुत देवाचा करार मोडून यरूशलेमांत तमाशखाने बांधून विधर्मी