पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ९१] या कालाचे परिमाण. २२७ साक्षात् सुशिक्षित होतो, त्याप्रमाणे आतापर्यंत देवाने निवडून घेतलेले लोक आपल्या भविष्यवाद्यांकडून अक्षय बोध करण्याने व शिक्षा लाव- ण्याने आपल्या मार्गास लाविले होते. इस्राएल लोक जणु आतां प्रौढ- पणांत आले आहेत, ह्मणून देवाने आपणांस स्त्रतां शिक्षण लावून वाढविले व बोध करून वागविले याविषयींचे फळ त्यांनी दाखवावे. जुन्या करारा- च्या पवित्र लेखांतील जे देवाचे वचन भविष्यवाद्यांनी ग्रंथरूप लिहन ठेवले ते त्यांच्या मार्गावर उजेड आणि त्यांच्या हातात काठी असे होते. मोश्याचे नियमशास्त्र त्यांच्या आचरणाचे नेम, आणि पुढे तार- णारा जो यावयाचा त्याविषयी भविष्यवाद्यांची भविष्यभाषणे त्यांच्या वि- श्वासाच्या आधारासाठी टेका असावयाची होती.--पाडावपणाच्या प्रवासांतून सर्वच इस्राएली माघारे आले असे नाही. परमेश्वराने आपले लोक आपल्या वचनाच्या देशांत परत आणले त्या वेळेस कित्येक संसारसुखास भुलून मागे राहिले. हे त्यांचे कृय स्तुत्य नाही. तथापि त्यांचे तिकडे राहणे हे तारणाऱ्याची प्रसिद्धि होण्याच्या वेळेस उपयोगी पडेल हे देवाने जाणले. कारण की इस्लाएल लोकांपैकी जे विदेश्यांमध्ये राहिले, त्यांकडून इस्राएलांस जी आशा व ईश्वरी वचने प्राप्त झाली होती त्यांविषयीं विदेशी लोकांस वर्तमान कळले आणि त्यांसही तारण संबंधी आशा व विश्वास हीं उत्पन्न झाली. सचना. भविष्यवचन समाप्त झाल्यामुळे जे ग्रंथ या कालमानांत लिहिले गेले, त्यांस देवाचे वचन असें मानितां येत नाही. ह्मणन यांस अपोक्रीफा (गुप्त लेख ) असे ह्मणतात. कारण की जसे केवळ खरे ईश्वरी उजेडरूप भविष्यवाद्यांचे लेख आह्मास आमच्या आयुष्य- मार्गावर प्रकाश देतात, तसे हे लेख आह्मास देऊ शकत नाहीत. तथापि जुन्या करारांतील धार्मिक व सुज्ञ भक्तांनी ते केलेले आहेत, ह्मणन जरी ते अपोक्रीफा लेख बिनचूक नाहीत तरी बोधपर व वाचाया- ला उपयोगी असतां मान देण्यास पात्र आहेत. जे लेख या वर्गामध्ये मोजतात ते येणेप्रमाणे : १. युदीताचे पुस्तक, यांत एका भक्तिमान यहादी विधवेची गोष्ट वर्णिली आहे. तिचे नगर बेथुलीया याला नव- खदेस्सर याचा सेनापति होलोफर्नेस याने जेव्हां वेढा घातला तेव्हा तिने धैर्य धरून ते मुक्त केले. २. शलमोनाचे ज्ञानाचे पुस्तक. त्याचा 28H