पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ - या कालाचे परिमाण. [प्रक० ९४ भविष्यलेख. १, यशया; २, इर्मया व इर्मयाचा विलाप; ३, यहेज्केल; ४,दानीएल.-५, होशेहा; ६ योएल; 9, अमोस; ८, ओबाद्या.-९,योना; १०, मीखा; १२, नहम; १२, हबकूक.--१३, सेफानिया; १४, हग्गाई%B १५, जखर्या; १६, मलखी.- या जुन्या करारांतील पवित्रलेखांविषयी प्रभू खीस्त ह्मणतोः “पवित्रलेख शोधून पाहा, कांकी त्यांकडून सर्व- काळचे जीवन तुह्मास आहे असे तुह्मी समजतां, आणि मजविषयीं साक्ष देणारे तेच आहेत' (योह० ५, ३९.). आणि पौल जो प्रेषित तो त्या लेखांविषयी तिमथ्याला लिहितो की: “पवित्र लेख तुला बाळ- पणापासून कळले आहेत, ते तुला खीस्त येशूवरील विश्वासाकडून तारण पावण्यासाठी ज्ञानी करायास समर्थ आहेत. संपूर्ण शास्त्र ईश्वरप्रणीत आहे; आणि उपदेशास, दोष दाखविण्यास, सुधारणुकेस, नीतीच्या शिक्षणास उपयोगी आहे, यासाठी की देवाचा मनुष्य निपुण व सर्व चांगल्या कामास सिद्ध व्हावा.” (२ तीम० ३, १५ -१७). सातवा भाग. मलखीभविष्यवाद्यापासून बाप्ति- स्मा करणारा योहान यापर्यंत कालमान. प्रक० ९४. या कालाचे परिमाण, मलखी होऊन गेला, तेव्हां त्याजबराबर भविष्यभाषण करण्याची देणगी ही जुन्या कराराच्या कालमानांत समाप्त झाली, आणि मलखी- पासून बाप्तिस्मा करणारा योहान्न प्रसिद्ध झाला तोपर्यंत (१०० वर्षे) कोणी भविष्यवादी प्रसिद्ध झाला नाही. जसा एखादा मुलगा आपल्या बापाच्या