पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ९३] जुन्या करारांतील शेवटले भविष्यवादी. २१५ मशीहाची नीच स्थिति व दुःखावस्या याविषयी विशेषेकरून त्याने भाषण केले. (अ० ९,९.) यांत त्याने मशीहाच्या शांतपणाने व नम्रतेने यरूश- लेमांत प्रवेश करण्याचे वर्णन केले ते येणेप्रमाणे: "अगे सीयोनाच्या कन्ये, अत्यंत उल्हास कर! अगे यरूशलेमाच्या कन्ये, प्रणाद कर! पाहा, तुझा राजा तुजकडे येतो आहे; तोन्यायी व तारणकर्ता आहे; तो नम्र व गाढवी- च्या शिंगरावर बसला आहे."-अ० १२,१०: "आणि मी दावादाच्या घराण्यावर व यरूशलेमांतल्या राहाणाऱ्यांवर प्रार्थनेचा व विनंतीचा आत्मा घालीन; आणि ज्या मला त्यांनी भोसकिले त्या मजकडे ते पाहतील."- अ०१३, ७: "सैन्याचा परमेश्वर ह्मणतोः अगे तरवारे, तूं माझ्या पालकावर व जोपुरुष माझा सहाय आहे त्यावर जागी होऊन ऊठ.पालकाला हाण, ह्मणजे मेंढरे विखरतील आणि मी आपला हात धाकल्यांवर फिरवीन.मलखी याने दुस-या मंदिराच्या दिवसांत मशीहाचे आगमन होईल याविषयीं, आणि त्याचा पुढारी (बाप्तिस्मा करणारा योहान्न) याच्या येण्याविषयी भविष्यभाषण केले. अ० ३, २: "पाहा, मी आपला दूत पाठवीन आणि तो मजपढे मार्ग सिद्ध करील; आणि ज्या प्रभूला तुह्मी शोधतां, कराराच्या ज्या दूताविषयीं तुमी सतोषतां तो आपल्या मंदिरांत अकस्मात् येईल."- अ० ४,५: “पाहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी तुह्माकडे एलिया भविष्यवादी पाठवीन." सूचना. मलखी हा जुन्या करारांतील भविष्यवाद्यांपैकी शेवटला, त्यानंतर कोणी भविष्यवादी झाला नसल्यामुळे मोश्यापासून मलखी- पर्यंत ज्या भावष्यवाद्यांचे लेख होते ते एकंदर एकत्र करून समाप्त केले. जुन्या करारांतील पवित्रलेखांचा संग्रह याला जुन्या करारां- तील "कानोन" ( सूत्र, ह्मणजे भाव ठेविण्याचे व आचरण करण्याचे परिमाण) असे ह्मणतात, जुन्या कराराच्या ग्रंथांत ३१ ग्रंथांचा समावेश आहे. त्याचे अनेक वर्ग आहेत. पहिला वर्गः नियमशास्त्र किंवा मोश्याची पांच पुस्तके. दुसरा वर्ग:इतिहासाची पुस्तकें; १, यहोशावा: २, न्यायाधीश; ३, रूथ; ४, शमुवेलाची दोन पुस्तके ५, राजांची दोन पुस्तके; ६, कालवृत्तांताची दोन पुस्तके; ७, एजा; ८, नहेम्या. ९. एस्तेर.- तिसरा वर्गः बोधपर पुस्तके; १, इयोब; २, गितांचे पुस्तक; ३, नीति; ४, उपदेशक, ५, शलमोनाचे गीत.-चौथा वर्गः