पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ जुन्या करारांतील शेवटले भविष्यवादी. [प्रक० ९३ करून प्रार्थना केली, आणि खिन्न होऊन राजासमोर उभा राहिला. तेव्हां राजा ह्मणालाः "तूं कां खिन्न आहेस?" नहेम्याने मटले: "माझ्या पूर्वजांचे नगर उजाड व त्याचे दरवाजे अग्नीने खाल्लेले असतां माझें मुख का खिन्न नसावे?" मग राजाह्मणालाः "तूं काय मागतोस?" तो बोललाः तुझा दास जर तुझा दृष्टीत कृमा पावत आहे तर म्या जाऊन आपल्या पूर्वजांचें नगर बांधावे, मगून मला आज्ञा दे." तेव्हां देशांतील अधिका- यांनी त्याला पोहंचवावे ह्मणून राजाने त्याजवळ पत्रे देऊन त्याला रवाना केले. मग नहेम्या यरूशलेमास आल्यावर तो कोट बांधू लागला. नंतर शोमरोनांतील सन्बलट नामें कोणी अधिकारी व इस्राएलाचे अनेक वैरा यरूशलेमावर लढाई करायास आले. परंतु यहूदी यांनी आपल्या देवाची प्रार्थना केली, आणि अहोरात्र पाहरा ठेविला. अर्धी मनुष्ये काम करीत होती आणि अर्धी ढाला व धनुष्ये व उरखाण धरीत होती. आणि जे कोट बांधीत होते, ते एका हाताने काम करीत होते व एका हाताने शस्त्र धरीत होते. आणि प्रयेक आपापल्या कंबरेस तरवार बांधून काम करीत होते. नहेम्या व त्याचे सर्व हे ( शत्रु विरुद्ध तयार असावे मगून ) आपली वस्त्रे अंगावरून काढीत नव्हते. आणि कोट समाप्त झाल्यावर सर्व लोक एका माणसासारखे एकत्र मिळाले. तेव्हां एना याजक याने लोकांच्या समुदायासमोर शास्त्र आणून प्रातःकाळपासून सायंकाळपर्यंत वाचले. तेव्हां आपण परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे चालू ह्मणून सर्व लोकांनी करार केला. प्रक० ९३. जुन्या करारातील शेवटले भविष्यवादो. पाडावप्रवासपणांतून जे लोक आले होते त्यांमध्ये शेवटले भविष्यवादी ह्मणजे हग्गाई, जखर्या व मलखी हे होते. हग्गाई याने धैर्याने मंदिर बांध- ण्याविषयी लोकांस उत्तेजन दिले आणि नवीन मंदिराच्या कनिष्टपणा- मुळे जे वृद्ध लोक खिन्न होते (प्रक०९०क ०१) त्यांचे त्याने शांतवन करून मटले: “पहिल्याच्या वैभवापेक्षा या दुस-या मंदिराचे वैभव मोठे होईल, कांकी सर्व राष्ट्रांचा इष्टविषय येईल" (अ० २,७-१०). याहून स्पष्ट भविष्यभाषण जखर्या याने उद्वार करणान्याच्या आगमानाविषयी कले.