पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ९२] एजा आणि नहेम्या. २१३ संगती देवाचे भविष्यवादी, मणजे हग्गई आणि जखर्या हे त्यांचे साह्य करीत होते. आणि दारयोवेशाच्या सहाव्या वर्षांत मंदिर समाप्त होऊन यांनी मोठ्या हर्षाने त्याची स्थापना केली. ___*) शोमरोनी ( प्रक० ८२ क० २ पाहा.) हे इस्राएली व विदेशी मिळून मिश्रित झालेले लोक होते. त्यांनी यहोवाचे भजन व अनेक प्रकारच्या मूर्तिपूजा करून धर्मही मिश्रित केला, म्हणून फिरून देऊळ बांधण्याच्या कामात यहूद्यांनी त्यांस काही मदत करूं दिली नाही. याजकरितां शोमरोन्यांनी शखेमागासी जो गरजीम डोंगर त्यावर आपल्यासाठी देऊळ बांधले. प्रक० 2. एब्रा आणि नहेम्या. (एज्जा ७–१०. नहे ० १–१३.) १. अहिशश्ता (अक्षिःश लंगीमाणूस) राजा याच्या दिवसांत एना नामक मोश्याच्या नियमशास्त्रांत निपुण, असा शास्त्री बाबेलाहून वर आला. त्याबरोबर इस्राएल वंशांतील कित्येक; आणि याजक, लेवी व गा- यक यरूशलेमास पोहचले. कांकी परमेश्वराचे नियमशास्त्र आचरायास व इस्राएलांत ते शिकवायास एखाने आपल्या मनांत आणले होते. राजाने परमेश्वराचे मंदिर बांधायासाठी सोने व रूपे त्याच्या संगतीं पाठवून दिले. परंतु त्या काळी इस्राएल लोक विदेशी लोकांपासून वेगळे राहिले नव्हते, कांकी त्यांनी आपणासाठी व आपल्या पुत्रांसाठी त्यांच्या कन्या बायका करून घेतल्या. तेव्हां जे देवाच्या वचनाचे भय धरीत होते, त्या सर्वांस एखाने एकत्र मिळवून मटले: "तुह्मी इस्राएलाचा दोष वाढवायाला परक्या बायका घेऊन पाप केले आहे. तर आतां त्या परक्या बायकां- पासून वेगळे व्हा."*) तेव्हां सर्व समुदायाने उत्तर दिले की तूं बोल- लास त्याप्रमाणे आह्माला केले पाहिजे. _*) पर्वकाळच्या अनुभवावरून सष्ट दिसून आले होते की मूर्तिपूजक बायकांकडून नेहेमी मूर्तिपरायण रीतीभाती व मूर्तिपूजा ही इस्राएली लोकांच्या घराण्यांत आली होती. २. आणि इस्राएलाच्या पाडावप्रवास्यांपैकी एक नहेम्या नामे त्याच अहारता राजाचा पाजणारा होता. त्याजवळ कित्येक यहूद्यांनी जाऊन दु:ख करून सांगितले कीः “यरूशलेमाचे कोट अझून मोडलेले भारत आणि नगर ओसाड पडले आहे. तेव्हां नहेम्याने शोक व उपास