पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ पाडावप्रवासपणांतून यहूद्यांचे स्वदेशी आगमन. [प्रक० ९१ बाहेर काढून त्यांच्या स्वाधीन केली. सोन्याची व रुप्याची मिळून ती सर्व पात्रे ५४०० होती. आणि दास व दासी खेरीज करून सर्व लोक ४२,००० होते ). दावीदाच्या घराण्याचा अधिकारी जरूबाबेल आणि येशूवा मुख्य याजक यांनी लोकांस यरूशलेमास नेले. तेथे त्यांनी प्रभूची वेदी बांधून मंडपाचा सण पाळिला. जेव्हां बांधणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिरा- चा पाया घातला, तेव्हां परमेश्वराची स्तुति करायास याजक करणे वाज- वायाला उभे राहिले आणि सर्व लोकांनी परमेश्वराला स्तवितांना मोठा प्रणाद केला. परंतु वृद्ध याजक व लेवी आणि मुख्य वडील यांतून ज्यांनी पहिले मंदिर पाहिले होते ते मोठ्याने रडू लागले), असे की त्यांमध्ये हर्षप्रणादाचा शब्द व रडण्याचा शब्द यांचा भेद करवे ना.

  • ) दानोएल खोरेशाच्या कृपेतील होता ( दानी० ६,२८.) म्हणून त्याने त्याला

यशायाचा भविष्यवाद कळविला असावा असे बहुधा बाटते. +) सर्व इस्राएली पाडावप्रवासपणातून परत आले असे नाहीत, त्यातील बहुत वाचेल देशातही राहिले. 1) शलमोनाने बांधलेल्या देवळाचा नाश केवळ ५२ वर्षांमागे झाला होता, कारण यहोयाकीम याच्या दिवसांत जो पहिला देशपार झाला, त्यापासून पाडावप्रवासपणाची ७० वर्षे मोजितात. या कारणास्तव ज्यांनी आपल्या तरुणपणात शलमोनाने बांधलेल्या देवळाचे सगळे वैभव स्खता पाहिले होते असे वहुत परत आलेल्या लोकांमध्ये होते.. २. आणि शोमरोन्यांच्या नगरांतील इस्राएलांचे विरोधी यांनी हे वर्त- मान ऐकिले, तेव्हां त्यांनी जरूबाबेल आणि मुख्य वडील यांजकडे येऊन परमेश्वराचे मंदिर बांधण्यांत आपले साह्य घ्यावें असी इच्छा दाखविली. परंतु इलाए ली त्याविषयी मान्य होई ना*) तेव्हां शोमरोनी यांनी देऊळ बांधण्यास हरकत केली आणि खोरेश राजाच्या मागे जे राजे झाले त्यांज- पाती जाऊन यहूदी फितूरखार व दुष्ट आहेत असे त्यांस भासविले. यावरून परमेश्वराच्या मंदिराचे काम दारयावेश (हिस्तास्पीस ) राजा याच्या राज्याच्या दुसऱ्या वर्षापर्यंत बंद पडले. त्याने ते बांधण्याचे काम पुढे चालविण्याविषयी परवानगी देऊन खर्चास द्रव्य आणि मजुरांस धान्य याविषयी मदत केली, कारण परमेश्वराचे मंदिर बांधावे, हा जो ठराव खोरे- शाने केलेला तो त्याला राज्याच्या कालवृत्तांतांत सांपडला. तेव्हां जरू बाबल व येशवा उठन मंदिर फिरून बांधू लागले आणि त्याच्या