पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक०९१] पाडावप्रवासपणांतून यहूद्यांचे स्वदेशी आगमन. २११ करितां उभे राहण्यास आणि आपल्या जाचणान्यांचा नाश करायास पर- वानगी होती त्या सर्व प्रांतांतील अधिका-यांस त्याने पत्रे लिहून पाठविली. मग असे झाले की ज्या दिवसी यहयांवर प्रबळ होऊन त्यांचा नाश आपण करणार आहो असी आशा त्यांच्या शबूंनी धरली होती त्याच दिवसीं यहदी आपल्या शāवर प्रबळ होऊन त्यांनी त्यांस मारिले. मग यहूद्यांनी या गोष्टींच्या अठवणीसाठी पुरीम नामें वार्षिक सण स्थापिला, प्रक० २१. पाडावप्रवासपणांतून यहूद्यांचे स्वदेशी आगमन. (एजा १-६.). उपोदधान. मितीवर जी भयप्रदर्शक अक्षरें लिहिलेली बेलशस्सर राजा- च्या दिसण्यांत आली होती त्यांजकडून जे काही त्याला दर्शविलें गेले, ते पूर्णही झाले. वीस वर्षांनी नाबोनेथ खाल्यांचा शेवटला राजा याच्या कारकिर्दीत पारस्यांचा राजा खोरेश याने फराथ नदी वळ- विली आणि नदीच्या तळावरून बाबेल शहरांत प्रवेश करून खाल्दी राज्याचा नाश केला. या खोरेशाविषयीं यशाया भविष्यवाद्याने देखील हैं भविष्य केले की: "खोरेशाविषयीं परमेश्वर ह्मणतो तो माझा पाळक आहे, तो माझा सर्व मनोरथ साधील. तो यरूशलेमास ह्मणतो, तुला बांधतील!-आणि मंदिराला तुझा पाया घालतील. आपला अभिषिक्त खोरेश याला परमेश्वर ह्मणतो, त्याच्या स्वाधीन राष्ट्रे करायाला म्या त्याचा उजवा हात धरला आहे" (यशा० ४४,२८,४५.२). १. इर्मया भविष्यवादी याकडून पाडावप्रवासपणाची सत्तर वर्षे परमे- श्वराने ठरविली होती ती पारस्यांचा राजा खोरेश याच्या राज्याच्या पहि- ल्या वर्षांत (इसवी सनापूर्वी ५३६ वर्षे) समाप्त झाली. तेव्हां परमेश्वराने खोरेशाच्या आत्म्याला प्रेरिल्यावरून त्याने प्रसिद्ध केले की: *) “आकाशांतील देव परमेश्वर याने मला पृथ्वीतली सर्व राज्ये दिली आहेत,आणि यरूशलेमांत त्यासाठी मंदिर बांधावे ह्मणून त्याने मला आज्ञा केली आहे. तुह्मापैकी जे याचे लोक आहेत त्यांनी वरती यरूशलेमास जाऊन इखाएलाचा देव परमे- याचे मंदिर बांधावें!" तेव्हां ते बांधायास वरती जाण्याकरितां ज्यां- च्या आत्म्याला देवाने प्रेरिले ते गेले. आणि परमेश्वराच्या मंदिराची जी पात्रे ननुखद्गमसराने यरूशलेमांतून काढून नेली होती, ती खोरेशा राणा