पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० एस्तेर राणी. [प्रक० ९० राजाचे दोघे शंड राजावर हात टाकायास पाहत होते, आणि त्याविषयी मर्दखाथ याने राजाला सूचना केली. मग राजाने पुसतपास करितां असे समजले की मर्दखायाला त्यावरून काही सन्मान मिळाला नाही. त्याच घटकेस मर्दखाय याला फासी देण्याची मसलत राजाला सुचविण्या- करितां हामान जवळ आला. त्याला पाहून राजाने मटले: “ज्याचा सन्मान करावा, ह्मणून राजाचा मनोरथ आहे त्या माणसाला काय करावे!" हामान तर आपल्या मनांत ह्मणालाः माझ्यापेक्षां कोणाचा अधिक मान करावा ह्मणून राजाला अवडेल? मग हामानाने राजाला उत्तर दिले की: "त्याला राजवस्त्रे लेववून मुगुट त्याच्या डोक्यावर घालावा आणि त्याला राजाच्या घोड्यावर बसवून नगराच्या चौकांत फिरवावे व त्यापुढे ललकारावे की ज्याचा मान करावा, ह्मणून राजाचा मनोरथ आहे त्या मनुष्याचे असे करतील. तेव्हा राजाने हामानाला मटले: "खरा करून तूं बोलला आहेस त्याप्रमाणे मर्दखाय जो यहूदी त्याचे तसेंच कर." तेव्हां हामानाने तसे केले, नंतर आपल्या घरी जाऊन शोक केला. परंतु राज- सेवकांनी येऊन एस्तेरेने जे भोजन तयार केले होते त्याकरितां हामा- नाला लवकर आणण्याची घाई केली. ४. मग भोजन होते वेळेस राजाने एस्तरेला मटले: “अगे एस्तेर, तुला मिळावे, ह्मणून तुझे मागणे काय आहे!" एस्तेर ह्मणाली: "हे राजा, तझी कृपादाष्टि मजवर झाली, तर माझा प्राण व माझे लोक मला द्यावे कांकी कदनवधन करून आमचा नाश करावा, ह्मणून आह्मी विकलेले आहो." तेव्हां राजाने मटले: “तसे करायास ज्याने धैर्य धरले आहे तो कोण कोठे आहे?" एस्तेर ह्मणाली: "शत्रु व वैरी हा दुष्ट हामानच आहे." है ऐकून राजा क्रोधयुक्त होऊन उठला असतां राजसेवकांपैकी कोणी येऊन ह्मणालाः “हामानाने आपल्या घरापासी पन्नास हात उंच असा एक खांब उभा केला आहे." तेव्हां राजा ह्मणाला: "त्यावर हामानाला फासीं दे." तेव्हां त्यांनी त्याला फासी दिले. नंतर राजाचा क्रोध शांत झाला आणि राजाने हामानाच्या ठिकाणी मर्दखाय याला नेमले व आपली मोहर त्याला देऊन मटले. "तुमाला बरे वाटेल त्याप्रमाणे तुह्मी यहूद्यां- विषयी माझ्या नांवाने लिहा व त्यावर माझी मुद्रा करा." तेव्हां त्याने राजाचे लेखक बोलाविले. ज्या नगरांतील व प्रांतांतील यहाांस आपल्या जिवा-