पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० एस्तेर राणी. २०१ कांकी ते सांगू नये ह्मणून तिचा पाळक जो मर्दखाय, याने तिला आज्ञा केली होती. त्यानंतर राजाने कोणी हामान नामें याला आपल्या सर्व प्रधानांच्या वरती मोठा व थोर केला. त्यावरून राजाचे सर्व सेवक हामा- नाला नमन करीत असत. परंतु मर्दखाय याने त्याला नमन केले नाही. तेव्हां हामान याने क्रोधाविष्ट होऊन सर्व यहद्यांचा नाश करायाची योजना करून राजाचे मन अशा रीतीने वळविले की, एका दिवसी सर्व यहूद्यांचा क्षय करावा ह्मणून त्याने आज्ञा केली. तेव्हां जासूद राजाची आज्ञा सर्व देशांतील राजांस पोहचविण्याकरितां झटकर निघून गेले, आणि सर्व प्रांतांतील यहूदी लोकांत मोठा शोक व आकांत झाला. २. तेव्हां मर्दखाय याने या सक्त हुकुमाची प्रत एस्तेरेला पाठविली, आणि तिने राजाकडे आंत जाऊन त्यापासी आपल्या लोकांकरितां रदब. दली करावी ह्मणून मागितले. परंतु राजाची असी आज्ञा होती की कोणी बोलाविलेला नसतां राजाकडे जाईल त्याला जिवे मारावे; केवळ ज्याकडे राजा राजदंड पुढे करील तो मात्र वाचावा. ह्मणून एस्तेर इने मर्दखा- याला सांगून पाठविले की तुझी मजकरितां तीन दिवस उपास करा, ह्मण- जे मी तसींच राजाकडे आंत जाईन. मग माझा नाश झाला तर झाला. आणि तिसऱ्या दिवसी एस्तेर राजाकडे आंत जाऊन उभी राहिली. राजाने तिला उभी राहतां पाहिले, तेव्हां तिजवर कृपादृष्टि होऊन राजाने राजदंड तिजकडे पुढे करून मटले: “अगे एस्तेर, तुला काय पाहिजे? तुझे मागणे काय आहे? एस्तेर ह्मणाली: “जर राजाच्या मनास येईल तर मी उद्यां भोजन तयार करणार आहे त्या भोजनास राजाने हामानासंगतीं यावे. हामान हे ऐकून फार संतुष्ट होऊन ह्मणालाः "राणीने मजशिवाय कोणाला राजासंगती भोजनास यावें मगन आमंत्रण दिले नाही. परंतु मी मर्दखाय यहूदी याला राजद्वारी बसतां पाहत आहे, तोपर्यंत हे अवघे मला काही सुखाचे नाही." तेव्हां त्याची बायको व त्याचे मित्र त्याला ह्मणाले: “ पन्नास हात उंच असा खांब करून त्यावर मर्दखायाला फासी द्यावे ह्मणून सकाळी राजाला सांग." ही गोष्ट हामानाला बरी वाटून त्याने खांब तयार करविला. त्याच रात्री राजाची झोप उडाली, ह्मणून त्याने कालवृत्तांताचें पस्तक आणायास सांगितले. ते वाचता वाचता त्यांत असे सांपडले की 27H